|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| यात्रोत्सव - बागलाणचे दैवत श्री यशवंतराव महाराज||

       महाराष्ट्रात नाशिक जिल्हा संतांची भुमी म्हणुन ओळखला जातो. यात नामवंत संत, देवपुरुष जन्माला घालणारा बागलाण म्हणजेच सटाणा तालुका आघाडीचाच, इंग्रजांचा अत्याचार, त्यातच सटाण्यात भयंकर दुष्काळ अशा परिस्थीतीत प्रत्यक्ष देवानेच देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या रुपाने धर्तीवर जन्म घेतला आणि एक भयानक संकट हद्दपार झाले. तेव्हापासुन देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची पुजा होऊ लागली. व त्यांना देवत्व प्राप्त झाले. लोक त्याच्या दर्शनासाठी लांबुन येऊ लागले. आणि या प्रसंगाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले.        मार्गशिर्ष महिन्याच्या सफला एकादशीला कडाक्याच्या थंडीत आनंदाची ऊब घेऊन येणा-या या यात्रेचे सर्वांना वेध लागतात. यात्रोत्सव सुरु होण्याआधी तीन दिवस श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे यशवंत लिलामृत ग्रंथाचे पारायण होते. सफला एकादशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता मा. तहसिलदार बागलाण, मा.देवस्थान अध्यक्ष व मा. नगराध्यक्ष सटाणा नगरपालिका यांचे हस्ते महापुजा होते. यात्रोत्सवाच्या काळात अन्नदान, किर्तन, कुस्त्यांची दंगल असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. केवळ बागलाण तालुक्यातील नव्हे तर मालेगाव, देवळा, कळवण, साक्री आणि इतर अनेक ठिकाणाहुन लोक या यात्रेत सहभागी होतात.

       दैनंदिन जीवनात बदल घडवुन एक आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते. यात्रेची सुरुवात महाराजांच्या रथाच्या मिरवणुकीने होते. गोरगरीब ते श्रीमंतापर्यंत जातपात कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वजण यात्रेचा आनंद लुटतात. यात्रेत येणारा प्रत्येक भाविक सर्वप्रथम महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करुन महाराजांचा कृपाप्रसाद घेऊनच यात्रेच सुरुवात करतो. नोकरीनिमीत्ताने बाहेरगावी असणारे सर्वच या पावनभुमीला भरल्या अंतकरणाने भेट देतात. त्यांच्याकरता ती एक पर्वणीच असते. यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा असतो. आकाशाला गवसणी घालणारे गगनभेदी झुले. लहानांच्या नव्हे तर मोठ्यांच्याही अंगावर काटे उभे करणारे एक ना अनेक प्रकारचे पाळणे सर्वांचे आकर्षण ठरतात. यात्रेतुन परततांना प्रत्येकाच्या मनात हुरहुर लागलेली असते. पण पुढच्या वर्षी परत यायचेच आहे ह्या आत्मविश्वासाने प्रत्येक जण भरल्या अंतकरणाने यात्रेच्या मनमुराद आनंदाच्या आठवणी व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे आशिर्वाद घेऊन यात्रेचा निरोप घेतो.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation