|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

देवलमामलेदार यशवंतराव महाराज

शाली वाहन शके सतरा
सदोतीसाव्या साली
भाद्रपदात पहिल्या पक्षी
नवमी गुरुवारी
पुणे शहरी शनिवारात
ओंकाराच्या महाली
प्रभात काली जन्म जाहला
सूर्योदयी समयी

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा जन्म ता. १३ सप्टेंबर १८८५ इ. सन रोजी पुणे जि. पुणे या गावी झाला. श्री. रा रा धोंडोनारायण भोसेकर हे श्री महाराजांचे आजोबा रूग्वेदी ब्राम्हण घरंदाज व सदाचार संपन्न परमदेवधर्मी होते. त्यांचे कुलदैवत श्री नरहरी होते. धोंडोपंतांना एकच महादेव नावाचा मुलगा होता. तेच हे महादेव महाराजांचे पिता होय. व सौ. हरिबाई ह्या श्री महाराजांच्या मातोश्री होय. सौ. हरिबाई व श्री रा रा बाळाजी मकाजी वाजपे. श्री पेशवे सरकारचे दिवाण माणकाश्वर यांचे हे कारभारी होते.

व हे वाजपे पुणे पेठ शनिवार घर नं. ११८ ओंकारांचा वाडा हल्ली शनिवार पेठेतील काँर्पोरेशनच्या शेजारील दवाखान्याच्या शेजारील या वाडयात या संताचा जन्म झाला. महाराजांच्या जन्मदिवशीच त्यांच्या मातृ आजोबांचे एक इच्छित कार्य पार पडले. म्हणुन त्यांचे नाव "यशवंत" असे ठेवण्यात आले. महाराजांचे शिक्षण इंग्रजी ४ थी पर्यंत पुणे येथे झाले. सकाळी महाराज नित्यनियमाने उठुन देवदर्शन घेऊन नंतर वडिल व आई यांना नमस्कार करुन अभ्यास करायला जात. महाराज अभ्यासात हुशार होते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यास महाराज नेहमीच तत्पर असत. एखाद्याकडे बोरु नसला तर महाराजांकडुन त्याला बोरु मिळे. कुणाजवळील शाई संपली की महाराजांकडुन त्याला मिळे. हेमाडपंती मोडी लिपीतील सुवाच्छ अक्षर अनेकांना मोहुन टाकी. अभ्यास कुलाचार व ईश्नर भक्ती यात महाराज सदैव रममाण असत. शालेय शिक्षणाबरोबरच कुलकर्णुणाचे शिक्षणदेखील महाराज शिकले. १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी शुक्रवार ७ गोरज मुहुर्तावर यशवंतराव महाराज व सुंदराबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यावेळी सुंदरा ६ वर्षांची होती. जीवाजीरावांनी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा साजरा केला. महाराजांना ७५० रु. वरदक्षिणा मिळाली. पितृगृहाची सुंदरा सासरी रुक्मिणी झाली. या विवाहसोहळ्यात दोन्ही बाजुंनी विपुल अन्नदान झाले. त्यांचे कवित्व " भोसे" व "टेंभुर्णी " या गावातील लोकांना बरेच दिवस पुरले.

|| आदिश्री फाउंडेशन व श्री. नानासाहेब निंबाजी पगार यांच्यातर्फे “देवमामलेदार” हे संकेतस्थळ संतशिरोमणी देवमामलेदार राजमान्य राजाधिराज योगीराज श्री यशवंतराव महाराजांच्या चरणी अर्पण.||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2018 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation