|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे सुविचार ||

"आपल्याकडे याचक म्हणुन येतात आणि आपण त्यांना याचक म्हणुन तृप्त केले की ते याचक म्हणुनच त्यांच्या मार्गाने निघुन जातात. ते कोण आहेत हे मनात आणु नये."

"अध्यात्म हे तुमच्या दैनंदिन व्यवहाराला, जीवनाला मारक नसुन ते प्रेरक आहे."

"राग धरायचा तर आपल्यातील सुप्त अवगुणांचा धरावा, मार द्यायचा तर तो कामक्रोधाला द्यावा. विकृत नजरेला द्यावा, म्हणजेच कणकणातील नारायण आपल्याला सर्व ठिकाणी सारखाच दिसेल कुठे जास्ती नाही की कुठे कमी नाही सगळीचकडे ओतप्रोत भरलेला !"

"बुध्दी, शक्ती, युक्ती व भक्ती सत्कारणी लावा. मत्सराने एखाद्या व्यक्तीवर विजय मिळवुन क्षणिक आसुरी आनंद मिळवण्यापेक्षा सात्विक प्रेमाने संपुर्ण जग जिंकून अक्षय्य आनंद मिळवावा. त्यासाठीच हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे.

"नारायणा, परोपकारासाठी बदलीच काय पण नोकरीतुन मुक्तता देखील स्वीकारण्याची बुध्दी मला होवो."

"हे परम पवित्र गोदामाते, मलाही तहानलेल्यांची तहान भागवित, भुकेल्या जीवांना अन्न देत, निराश्रितांना अन्न देत, जो जे वांच्छिल ते त्याला देत अनंतकोटी ब्रम्हांडानायकाच्या स्वरुपात लीन होण्याची शक्ती दे."

"चराचरी व्यापकता जयाची
अखंड भेटी मजला तयाची
परंपदी संगम पूर्ण झाला
विसरु कसा मी गुरु पादुकांला "

"नियम कायदा, शिस्त या सर्वांचा अंतिम उद्देश तरी काय ? सुव्यवस्था हाच ना ? सुव्यवस्थाच अडचणीत आली आहे. नियम हे साधन आहे, साध्य नव्हे ! साधनाला चिकटुन बसल्याने साध्यच धोक्यात येत असेल तर साधन बाजुला सारले पाहिजे"

"जेथे नाम तेथे देव जेथे देव तेथे भाव"


"तुम्ही कुठेही असा, देशकाल, परिस्थिती परत्वे बाह्य बदल झाला तरी कर्मयोग, कर्तव्य, देव, अध्यात्म, विश्वधर्म, विश्वबंधुत्व, जीवब्रम्ह सेवा यांना बाधा येण्याचे कारण नाही. हे अध्यात्मिक सत्य सर्व जगाला पटविण्यासाठी मी जीवन जगेन."

"अनंताच्या इच्छेनुरुप आपण राहावे योगाने हरखुन जाऊ नये. व वियोगाने दुःख पावू नये कामात राम पहावा आणि रामनामात काम करावे म्हणजेच सर्वच दुःखातुन सुटका होते."

"चमत्कार देव देवता व अदृश्य दैवते करतात. आपण काय भक्ती करतो. भक्तीचे फळ मिळते. या जगात प्रत्येक कृतीला परिणाम असतो. तेच फळ असते. जसे कर्म तसे फळ फलदाता भगवान नारायण व इतर दैवते आपल्या दृष्टिने अदृष्य साधन मार्गानी फळे देतात. ते आपल्या चर्मचक्षुला दिसत नाही व बुध्दीला गम्य होत नाहित म्हणुन त्यांना चमत्कार म्हणावे लागते इतकेच."

"संत, साधु, योगी यांच्या पावित्र्यामुळे व त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामुळे अनेक दैवते व पवित्र आत्मे हे अदृष्य रुपाने तेथे नेहमी असतात. साधुसंताकडे लोक जातात व प्रार्थना करतात. कधी कधी असे होते की, संत प्रार्थनार्थीला तुझे काम होईल असा आशिर्वाद देतात. हा आशिर्वाद आपल्याला काम करण्याची आज्ञा आहे असे एखादे दैवत मानते व लगेच कामगिरीवर निघते व काम करुनही टाकते. त्याची इतरांना म्हणजे माणसांना जाणीव नसते."

"आपल्या सर्वांवर प्रभुची कृपा असते. द्वारकाधीश पैठणला एक नाथ महाराजांकडे गेले. ते कृपा नव्हे सेवा म्हणुन. आई मुलाकडे धावुन जाते, तसा प्रभु भक्ताकडे जातो. कोणते तरी कारण काढुन भक्त आपली प्रेमाची हौस फेडुन घेत असतो."

"प्रभो आज आम्ही कृतार्थ झालो, कितीदा तरी आपण वैकुंठ सोडुन आम्हा क्षुद्र जीवांसाठी कष्ट घेतले. सेवा केली. धन्याने चाकरी करावी असा उलटा न्याय होतो."

"षडरिपुवर विजय मिळवुन सदासर्वकाम सर्वठायी परमेश्वर पाहीलात तर मग तो कसाही कुठेही आला तरी आपल्याकडुन त्याची पुजाच होते. अनादर होऊ शकत नाही."

संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation