|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| शिक्षण व विवाह ||

यशवंत अभ्यासात हुशार होता. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यास तो तत्पर असे. एखाद्याजवळ बोरू नसला की त्याने यशवंताजवळ येऊन सांगावे. यशवंता आपला बोरू त्याला देऊन टाकी. दुसऱ्या कुणा विदयार्थ्याकडे कागदासाठी पैसे नसले तर यशवंता आपल्याजवळील कागद त्याला देई. कुणाची शाई संपली की त्याला यशवंताकडून ती मिळे. यशवंत आठ वर्षांचा झाला. महादेवपंतांनी शके १७४६ जेष्ट वद्य प्रतिपदेस दहाव्या घटकेला यशवंताचे उपनयन केले. यशवंत आता द्विज झाल्याने त्याला अंगणात देवपूजेचा खेळ मांडण्याची आवश्यकता राहिली नाही. तो आता खरोखरची देवपूजा देवघरात बसून करू लागला. स्नान, संध्या, शोडषोपचार पूजा, मंत्रोपचार, नैवद्य, वैश्वदेव, अतिथीपूजा, वेद पठाण, दान हे सर्व तो लवकरच अगदी वडिलांप्रमाणे करू लागला. शालेय शिक्षणाबरोबरच कुलकर्णीपणाचे काम देखील तो शिकला.हेमाडपंती मोडी लीपीतील त्याचे सुवाच्च्च अक्षर अनेकांना मोहून टाकी.

अभ्यास, कुलाचार व ईश्वरभक्ती यात गढलेला यशवंत दिवसेंदिवस गंभीर दिसू लागला. चेहऱ्यावरील तेज:पुंज भाव. तेजस्वी पण करुणार्द्र नेत्र, सुडौल बांधा, मुखी हरी नाम. यामुळे पहाणाराला वाटे. ‘हा पूर्वजन्मीचा कुणी योगभ्रष्ट पुण्यात्मा जनाला पावन करण्यासाठी महादेवपंतांच्या घरी आलेला दिसतो. किशोरावस्थेतील यशवंतास एकदा टेंभूरणीच्या जिवाजी बापूजी देशपांडे यांनी पहिले आणि लगेच मनाशी निश्चय केला की या तेजस्वी मुलास आपला जामात करावे. लवकर म्हणजे शके १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी शुक्रवारी गोरज मुहूर्तावर यशवंत व सुंदरा यांचा विवाह झाला. त्यावेळी सुंदरा ६ वर्षांची होती. जीवाजीरावांनी मोठया थाटामाटात विवाह सोहळा केला. जावईबापूंना ७५० रुपये वर दक्षिणा दिली. पितृगृहाची सुंदरा सासरी रुक्मिणी झाली. या विवाहानिमित्त दोन्ही बाजूंना विपुल अन्नदान झाले. त्याचे कवित्व “भोसे” व “टेंभूरणी” या दोन्ही गावातील लोकांना बरेच दिवस पुरले.

|| आदिश्री फाउंडेशन व श्री. नानासाहेब निंबाजी पगार यांच्यातर्फे “देवमामलेदार” हे संकेतस्थळ संतशिरोमणी देवमामलेदार राजमान्य राजाधिराज योगीराज श्री यशवंतराव महाराजांच्या चरणी अर्पण.||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2017 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation