|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

रथाचे शिल्पकार

रथाचे शिल्पकार – कै. भिकाजी रतन जगताप कळवणकर
जन्म दिनांक – १९-५-१८७४
जन्म स्थळ – कळवण
त्यांचे बालपण कळवणमध्येच गेले. वयाच्या बाराव्या वर्षी त्याचे वडिल वारले. नंतर आईने काबाडकष्ट करुन पालनपोषण केले. बंधुचे नाव- निंबाजी, रथाचे मदतनीस त्याची कलाकारी, शिल्पकारी व काम करण्याची सचोटी सर्वदुर प्रसिध्द होती. त्यांनी रथाचे काम अतिशय सुंदर अप्रतिम असे केले आहे. रथाचे खालिल फाउंडेशन व पुढील चाकाचे व्हिल इतके अप्रतिम आहेत की, रथ १२ फुटाचे आतच वळण घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, रथाचे काम करतांना पुज्य महाराजांचे या भव्य वास्तुस पदस्पर्श एकाही कारागिराने होऊ दिला नाही. चाकांचे फाउंडेशन झाल्यावर गाभारा खाली तयार करुन नंतर गवंडी लोकांसारखे पालक बांधुन कळसा पर्यंत काम पुर्ण केले. पुज्य महाराजांचा रथ १९२१ साली निघणेस सिध्द झाला १९१९ साली कचेरीचे काम पुर्ण झाले. आज मितीला सुध्दा रथ त्यांचे घरावरुन जाण्याची प्रथा आहे. त्यांचे माताश्रींनी पुज्य यशवंतराव महाराजांचा पदस्पर्श केला आहे.

भिकाजी बाबांची परिस्थीती हालाखीची झाली होती. तरीही त्यांनी अतिथी आदर, सदाचार सत्कर्म सोडला नाही. १९४०-४१ च्या सुमारास ते नेहमी मंदिराचे पाठिमागे आरम नदित स्नान करावयास जात असत. पहाटे तीन वाजता हा त्यांचा नियम होता. स्नान करुन पुज्य यशवंतराव महाराजांचे दर्शन घेत, मग बालाजी महाराजांचे दर्शन घेत. त्या दिवशी ते बाहेरील पायरीवर बसुन दर्शन घेऊन म्हणाले, महाराज मी उदरनिर्वाहासाठी सटाणा सोडुन जात आहे. तेव्हा त्यांनी आवाज ऐकला. "कालांतराने" आजुबाजुला कोणीही नव्हते. मंदिराचा दरवाजा बंद होता. तर ते शब्द महाराजांचे होते. नंतर या भिकाजी बाबाचा काळ खरोखरच समृध्द झाला. त्यांचा संपुर्ण परिवार सुखा समाधानाने नांदु लागला. त्यांनी निती, सचोटी कधीही पायंदळी तुडविली नाहीत. अशा या महान शिल्पकाराचा महानिर्वाण ७-१०-१९८१ विजयादश्मीच्या दिवशी झाला. मोबदला न घेता रथाचे काम पुर्ण केले. रथाचे काम पुर्ण होण्यास ३ वर्ष लागले. साधारणपणे १९२१ पासुन रथ मिरवणुक निघण्यास प्रारंभ झाला.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation