|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| प्रस्तावना ||

      धन्यवाद ! मनापासून खूप खूप आभार !!! आपण सर्वानी दाखवलेल्या सार्थ विश्वासाबद्दल व अमुल्य अशा सहकार्याबद्दल. देवमामलेदार ह्या संकेत स्थळाचे १० व्या वर्षात यशस्वी पदार्पण. होय, २३ डिसेंबर २००८ हा दिवस माझ्या आयुष्यात व बागलाणच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. ही सेवा मी ज्यांनी मला ज्ञानसागर दिला. ते माझे आजोबा कै. निंबाजी बारिकराव पगार व आजोळचे आजोबा कै. उखाजी खंडु सोनवणे यांचे चरणी विनम्र भावाने अर्पण करतो. या कामात माझे प्रेरणास्थान माझे वडिल श्री.नानासाहेब निंबाजी पगार व आई सौ. निर्मला नानासाहेब पगार यांच्या प्रेरणेशिवाय हे काम अशक्यच राहीले असते. यांच्या कृपाशिर्वादाने हे संकेतस्थळ संतशिरोमणी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या चरणी अर्पण....

      वेळ १२.०२ मिनिटे. दिनांक २३ डिसेंबर २००८. मा. सौ. इंदिराताई चौधरी (बागलाणच्या इतिहासातील प्रथम महिला तहसीलदार), तहसीलदार बागलाण यांच्या हस्ते देवमामलेदार संकेतस्थळाचा शुभारंभ...कार्यक्रमास उपस्थिती बागलाणचे आमदार मा. श्री. संजय कांतीलाल चव्हाण. श्री. रंजनकुमार शर्मा (डी वाय एस पी- बागलाण), श्री. भालचंद्र केदूशेठ बागड (अध्यक्ष- देवमामलेदार श्री. यशवंतराव महाराज देवस्थान, सटाणा). श्री.प्रदिप उखाजी सोनवणे, श्री. बाळासाहेब जगन्नाथ सोनवणे (माजी. नगराध्यक्ष – सटाणा नगरपालिका), श्री. शालीग्राम पाटील (पी आय. पोलीस स्टेशन, सटाणा) श्री. विजय पंडित पाटील, श्री. बी. जी. वाघ. (ना.म.सोनवणे, आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेज, सटाणा.),श्री. विजय वाघ (माजी.नगराध्यक्ष–सटाणा नगरपालिका), सौ. सुमन भास्कर शेवाळे (माजी. नगरसेविका-सटाणा नगरपालिका) कुलकर्णी गिरणीवाले. श्री. किशोर ओंकारमल भांगडिया, श्री. शंकर कापडणीस, श्री फेगडे सर, श्री. बी. डी. बोरसे सर, श्री. किशोर कदम (माजी. नगरसेवक- सटाणा नगरपालिका). श्री पांडुरंग सोनवणे (माजी.नगराध्यक्ष–सटाणा नगरपालिका). तसेच सर्व भक्तजन व मित्र परिवार. आज डिसेंबर २०१६, तब्बल ८ वर्षांचा प्रवास देवमामलेदार ह्या संकेतस्थळाचा. महाराजांचे संकेतस्थळ प्रथम सुरु केल्यापासून तर आजपर्यंतच्या प्रवासात अनेक चांगले वाईट असे अनुभव आले. काही अनपेक्षित नकारघंटेस सामोरे जावे लागले.प्रत्येक चांगल्या निर्मितीमागे एक हेतू असतो. निर्मितीमागची एक जाणीव, इच्छाशक्ती असते. अशाच उदात्त हेतूने देवमामलेदार संकेतस्थळाची निर्मितीची प्रक्रिया पार पडली. संकेतस्थळ बनवण्याचा प्रवास म्हणा किंवा त्याबद्दलचा अनुभव आज मी आपणा सर्व भक्तजनांशी मनमोकळेपणाने मांडणार आहे. संकेतस्थळाची सुरुवात डिसेंबर २००८ ला झाली. पण त्याआधी २ वर्षे ह्यातील माहितीची मांडणी व संकलनासाठी लागले. ज्यामध्ये बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. आजपासून १० वर्षे आधी संकेतस्थळ हि संकल्पना खूप नवीन होती. परंतु महाराजांचे कार्य व इतिहास सातासमुद्रपालीकडे पोहचविण्यासाठी याच्याशिवाय दुसरे प्रभावी माध्यम माझ्याकडे नव्हते. परमेश्वराची इच्छा आणि कृपा मोठमोठ्या अडचणींना, अडथळयांना पार करून इच्छित सत्कार्य कसे पार होते. याचा जिवंत दाखला म्हणजेच देवमामलेदार संकेतस्थळ. कदाचित काही कार्यांचे नियोजन हे परमेश्वराने आधीच केलेले असते. संकेतस्थळाची संकल्पना माझ्या आईवडिलांशिवाय प्रथम ज्यांच्यासमोर मांडली ते म्हणजेच देवस्थानचे अध्यक्ष श्री. भालचंद्र (आप्पासाहेब) बागड. आप्पांना संकल्पना खुपच आवडली. परंतु अशी संकल्पना माझ्याआधी काही जणांनी मांडली. व ती प्रत्यक्षात मात्र साकार झाली नाही. याची जाणीव त्यांनी मला करून दिली. संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याची मोठी जबाबदारी होती. काम परमेश्वराचे आणि करवून घेणारा पण तोच मग ओढ होती ती फक्त पूर्णत्वाची.

      आप्पासाहेबांनी या कामी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. महाराजांचे सुविचार त्यांनी स्वत: मोतीदार अक्षरात लिहून दिले. श्री. बाबुलाल मोरे (भाऊसाहेब) यांनी ह्या कामी वेळोवेळी मदत केली. महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र व माहिती उपलब्ध करून दिली. तसेच २१ अध्यायांच्या माहितीसाठी रंगीत छायाचित्रांचा संग्रह सौ. रागिणी सिनकर यांनी साकारला आहे. तो संग्रह त्यांनी मला उपलब्ध करून दिला. नाशिक देवस्थानच्या अध्यक्षांनी शाळीग्राम व माहितीसाठी विशेष सहकार्य केले. महाराजांच्या मूर्तीचे छायाचित्र, रथाचे छायाचित्रांसाठी श्री. प्रवीण सोनवणे यांनी विनामूल्य मदत केली. महाराजांच्या महापूजेचे, मिरवणुकीचे, यात्रोत्स्वाचे, तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीचे छायाचित्रासाठी श्री. रोशन खैरनार यांचे विशेष सहकार्य मिळाले. श्री. रोहित जाधव यांनी महाराजांचे पोवाडे, आरती, कवने, भजन, भुपाळी तसेच जन्म कुंडली उपलब्ध करुन दिली. माझा मित्र परिवार खूप मोठा असल्याने प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणे येथे शक्य नसल्याने, ह्या कामात मला अमुल्य अशी मदत करणारा मित्र परिवार, सर्व ज्ञात व अज्ञात अशा भक्तजनांचा, व आप्तेष्टांचा व सबंध बागलाणवासियांचा मी अत्यंत आभारी आहे. आपणा सर्वांची भविष्यातील वाटचालीस अशीच साथ राहो. ही महाराजांच्या चरणी प्रार्थना.

नवीन माहितीसह देवमामलेदार संकेतस्थळ

      आपल्याकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार व हाती आलेल्या माहितीच्या आधारे देवमामलेदार ह्या संकेतस्थळाला एक मूर्त रूप देण्याचा माझा प्रयत्न महाराजांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत आहे. नाविन्याची ओढ, चांगला बदल, नवीन माहिती समाविष्ट करून भव्यदिव्य निर्मितीचा ध्यास, देवमामलेदार संकेतस्थळास एका नवीन रुपात, माहितीचा गाभा तसाच ठेवून आपणा सर्वांसमोर मला आणतांना अत्त्यानंद होत आहे. महाराजांच्या आशीर्वादाचा कृपाप्रसाद आपल्या सर्वांचे अमुल्य सहकार्य व विश्वास याचेच फळ म्हणजे संकेतस्थळाचे ९ व्या वर्षात नविन माहितीसह पदार्पण! संकेतस्थळाला आतापर्यंत ७५ हून आधिक देशातून भाविकांनी भेट दिली आहे. ६० हजारहून आधिक भाविकांची भेट. संकेतस्थळावर यशवंतलिलामृत ग्रंथाचे (संपूर्ण यशवंतलिलामृत ग्रंथ) २१ अध्याय उपलब्ध करून देतांना मला विशेष आनंद होत आहे. तसेच महाराजांची दुर्मिळ अशी जन्म कुंडली, पोवाडे, कवने, भजन, भुपाळी, आरती ई. चा समावेश करण्यात आला आहे. महाराजांची जास्तीत जास्त माहिती व दुर्मिळ अशा छायाचित्र संग्रह उपलब्ध झालेला आहे. संकेतस्थळाच्या नवीन निर्मितीत मी विशेष आभार व्यक्त करेन माझ्या मुलीचे आदिश्रीचे. कारण तिच्याबरोबर हसण्या-खेळण्याचा वेळ घेऊन मी संकेतस्थळ निर्मितीत लावला. तसेच माझी पत्नी सौ. अंजली अविनाश पगार (अध्यक्ष, आदिश्री फाउंडेशन) हीची, संकेतस्थळाची मांडणी, रंगसंगती, माहितीची निर्मिती अशा प्रत्येक कामात मोलाची साथ लाभली सदर संकेतस्थळ हे मी स्वखर्चाने तयार केले आहे. पुन्हा एकदा या कामात मला मदत केलेल्या सर्व भाविकांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. विनंतीपुर्वक आव्हान !!! सर्व भक्तजन व बागलाणवासीयांना नम्र विनंती आहे की, संकेतस्थळा व्यतिरिक्त आपल्या जवळ अजून काही माहिती व छायाचित्रे असतील तर कृपया ह्या इमेल आय डी वर पाठवा. avinash.pagar@gmail.com . माहितीची पडताळणी करुन माहिती संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येईल.

श्री. अविनाश नानासाहेब पगार
MCS, MBA (IT & Systems)
आदिश्री फाऊंडेशन
सटाणा, ता. बागलाण जि. नाशिक

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation