|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| महाराजांचे शिष्यगण ||

|| श्रीमत् सदगुरु पदमनाचार्य स्वामी महाराज ||

|| गंगागिरी महाराज ||

महाराजांची मिरवणुक निघाली होती. भाविकांचा ओघ हटत नव्हता तसा महाराजांचा दयेचा ओघही कायम होता. दयेच्या वर्षावाने तृषार्त भक्त चिंब झाले होते. कुठलीशी जत्रा होती. जत्रेत गंगा नावाच्या पहिलवानाने प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लावली होती. लोकांनी गंगाला डोक्यावर घेऊन मिरवत व जयजयकार करीत ग्रामदेवतेकडे आणले. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन नाचणारा जमाव महाराजांकडे आला गंगाने भक्तीभावाने महाराजांच्या पायावार डोके ठेवले. महाराज म्हणाले, देवा चांगलाच पुरुषार्थ केला जयजयकारही झाला आनंद आहे. असाच फड अध्यात्मात गाजवला तर चिरंतन जयजयकार होईल. गर्दिच्या गदारोळात महाराजांचे शब्द कुणी ऐकला न ऐकले महाराजांनी त्याला शब्दांनी झपाटुन टाकले होतेय त्यातच ऊँ नमो नारायणाय शब्दांनी तो मंत्रमुग्ध झाला होता. आता कामाला लागा या महाराजांच्या शब्दांनी आता तो भानावर आला होता. त्याने पुन्हा महाराजांचे पाय पकडले. महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. गंगागिराने महाराजांची पुजा केली. महाराजांनी भगवी वस्त्रे मागवली व ती गंगागिरीला धारण करण्यास सांगितले. आता हरीनामही संपणार नाही आणि दिक्षाही बंद पाडायची नाही ! अशी महाराजांच्या चरणी प्रतिज्ञा करुन गंगागिरी तेथुन सिध्द मार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्ग निघाला.

|| श्रीमत् सदगुरु पदमनाचार्य स्वामी महाराज ||

महाराजांचा मुक्काम मुंबईत अंग्रेवाडीत होता. दर्शनार्थींच्या गर्दीत एक तेजस्वी तरुण दरदरोज दिसत असे गोविंद नावाचा तो वैराग्य बाणलेला एक मुमुक्षु होता. सत्संग वाढु लागला व संत महात्म्य मुखारविंदातुन प्रकट होऊ लागले. सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी अर्थात देवमामलेदार यांचे दर्शन गोविंदास झाले. त्या क्षणीच गोविंदाच्या अंतकरणातील तळमळ शांत झाली. नमस्कार केल्याबरोबर महाराज उदगारले "हा तर पुर्वीचाच सिध्द आहे !" दान सत्पात्री पडावे तसे महाराजांचा अनुग्रह मिळुन गोविंद आता पदमनाचार्य स्वामी झाले. त्यांच्या मुखातुन श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्तुती सुमनांच्या रुपाने पडु लागलीय ते गुरुभक्तीत तल्लीन झाले. स्वामी महाराजांचा जन्म १८५० साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री रघुनाथ स्वामी महाजन व आईचे नाव उमाबाई होते. त्यांचे मन चिंतनात मग्न असे व रंजल्या गांजल्या बांधवांचा उध्दार करण्याची तळमळ लागल्याने त्यांनी नोकरीची गुलामगिरी सोडली. व लोकांना सन्मार्गास लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

|| सदगुरु श्री उपासनी महाराज ||

सदगुरु श्री उपासनी महाराज यांचा जन्म सटाणा येथे १५ मे १८८० रोजी झाला. त्यांनी आपले ६२ वर्षांचे आयुष्य एका विशिष्ट ध्येयवृत्तीने लोककल्याणासाठी वाहीले.

त्यांच्या कृतीचा, स्मृतीचा व वाणीचा सुगंध मात्र अखंड परिमळत आहे. गोपाळशास्त्री उपासनी हे त्यांचे आजोबा होते. आजोबा व्युत्पन्न पंडित होते. घरात वेद पठण, संस्कृत अध्ययन चालत असे.वयाच्या ८ व्या वर्षी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या हस्ते चिरंजीव गोविंद यांचा उपनयनविधी झाला. श्री यशवंतराव महाराज यांनी त्यांच्या गळ्यात यज्ञोपवित बांधले. त्यांना यज्ञोपवित प्रधान केले. सदगुरु उपासनी महाराजांच्या मुंजीच्या कार्यक्रमासाठी देवमामलेदार यशवंतराव महाराज सटाण्याहुन बदली झाल्यावरसुध्दा नाशिकहून येथे आले होते. या दोन्ही संतांच्या पावलांचे ठसे सटाणा शहराच्या मातीत उमटले आहे. उपासनी महाराजांचे महानिर्वाण २५ डिसेंबर १९४१ रोजी साकोरी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे झाला.

|| सीताराम महाराज ||

महाराजांच्या मुंबई मुक्कामात एका मुमुक्षुला महाराजांच्या कृपाप्रसादाची अवीट गोडी चाखावयास मिळाली. सीताराम झिलु मयेकर हे त्याचे नाव. सावंतवाडी संस्थानातील मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील हा तरुण चित्रकार व्यवसायानिमीत्त मुंबईस आला होता. संसाराच्या रामरगाडयाबरोबर रामनामाची धूनही त्याच्या पाठीशी होती. नामस्मरण, भजनाची आवड यामुळे साहजिकच साधु संतांच्या दर्शनाचा छंदही सीतारामच्या मनाला जडला होता. महाराजांच्या पायावर डोके ठेवताच सीताराम ब्रम्हतन्मय स्थितीत जवळजवळ दिड घटका होता. "बाळ नारायणा स्वस्वरुपाच्या चिंतनात नारायण नामोच्चाराने अखंड आनंदाचा सतत स्वाद घे." महाराजांनी आशिर्वाद दिला. "हे देवाधिदेवा, आपणच नारायण स्वरुप आहात मी ही त्याचाच अंश असून त्याच नारायणत्वाचा सर्वव्यापी प्रत्यय आपले दर्शन घेतल्यापासुन येत आहे. हे गुरुमाऊली ह्या दासानुदासावर कूर्म दृष्टीने कृपा असु द्या." सीतारामाने प्रसादाची पावती दिली. महाराज हसुन म्हणाले, "रंगसंगती तर उत्तम जमली आहे. विसंगती कुठे दिसत नाही. सप्तरंगांच्या विलक्षण "रंगसंगतीने अविस्मरणीय व सर्वसुंदर चित्र तयार होते. पण त्याहीपुढे जाऊन सप्तरंगांच्या विलक्षण मिश्रणाने प्रकाशाचा रंग तयार होतो. प्रकाशरुप परमात्मा तुझे सर्व जीवन अध्यात्म प्रकाशमान करो. सप्तस्वराच्या लयीत परमात्म्याच एक सुर लागो. सुधामृत सागरात श्रीगुरु माऊलीचे बोट धरुन अथांगतेचा व अनंतत्वाचा अनुभव घेत असल्याचे सीतारामाला जाणवले. पुन्हा एकदा सदगुरुंचे पाय धरुन चरणधुळ मस्तकाला लावली. व चित्रकार आत्मचरिज्ञ होऊन बाहेर पडला. घरी परततांना सीताराम महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाने पुर्णपणे भारावुन गेला होता. सीतारामला अंतरीची खुण पटली होती. सीताराम संसारात राहुनही ब्रम्हनंदात राहण्यासाठी पुढे वाटचाल करु लागला.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation