|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

महाराजांच्या निजीवस्तू

शाळिग्राम

अक्षरे आहेत पण प्रकाश नाही, मार्ग आहे पण दीपक नाही, आता अंत नका पाहु आता सदगुरु..! य़शवंतराव महाराज तळमळत होते. निद्रादेवी जवळ येत नव्हती. उत्तर रात्र होऊन गेली होती. अश्रुंचा ओघ थांबत नव्हता. झोपेची अंमळ तार आली. झोप कसली ? सुषुप्ती अवस्थाच ती... ! हळुहळु धुसर प्रकाश पसरत चालला. त्यात जांभळ्या रंगाची छटा येऊ लागली आणि एक तेजस्वी महापुरुष समोर बसलेला दिसला, आजानुबाहु, दिगंबर, डाव्या मांडीवर उजवी मांडी ओढुन धरलेला पायांचे तळवे मात्र जमिनीला टेकलेले, भव्य कपाळ, हि-याप्रमाणे चकाकणारे नेत्र, भेदक नजर..! ते महापुरुष म्हणाले "बेटा घबराओ नही, ये लो काम की चीज" एक शाळिग्राम यशवंताच्या हातावर ठेऊन ते म्हणाले. "इसकी भक्ती भाव से पुजा करना तुम्हारी मनोकामना पुरी होगी." नंतर ते अंतर्धान पावले. य़शवंतरावांना जाग आली. तळमळ शांत झाली. ते मनोमन हसले. या सुखद स्वप्नाचा आनंद पुनःपुनः घ्यावा असे त्यांना वाटु लागले. काही वेळ ते त्याच आनंदात पडुन राहिले. मग उषःकाल झाला तसे ते विष्णु सहस्त्रनाम सुरु करुन हात टेकुन उठु लागले तेव्हा त्यांच्या हाताला काही तरी टणक वस्तु लागली. ती वस्तु म्हणजेच "शाळिग्राम " प्रत्यक्ष भगवंताने महाराजांना दिलेला.

तिजोरी

हिच ती तिजोरी १८७०-७१ मधील बागलाण मधील दुष्काळात देवमामलेदारांनी याच तिजोरीतील १ लाख २७ हजार रुपये गोरगरिबांना वाटले. ८ मे १८६९ रोजी देवमामलेदार सटाण्याला बदलुन आले. १८७०-७१ मध्ये या भागात भयंकर दुष्काळ पडला. अनेक लोकांची उपासमार होऊ लागली. लोकांचे हाल व उपासमार पाहुन महाराजांचे मन उद्विग्न झाले. अंतकरण तळमळु लागले. एके दिवशी महाराजांनी सकाळी नित्यनियमाची देवपुजा जरा लवकर आटोपली व तडक कचेरीत आले. खजिनदाराकडुन खजिन्याच्या चाव्या घेतल्या. महाराजांनी खजिना उघडला. अंगावरील उपरण्यात जेवढे पैसे घेता येतील तेवढे घेतले. व रस्त्याने जो गोरगरिब दिसेल त्याल पैसे वाटण्याचा सपाटा चालविला ही वार्ता गावात सर्वत्र पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी धावु लागल्या येतील त्यांना महाराज पैसे वाटित होते. हा कार्यक्रम सकाळी ८ वाजेपासुन अखंड चालु होता.

खुर्ची

सटाणा येथे १८६८ ते १८७२ या काळात देवमामलेदार म्हणुन महाराजांनी जी गोर गरिबांची सेवा केली व ज्या वेळेस न्यायदानाची वेळ आली त्या त्या वेळेस महाराजांनी ह्या खुर्चीवर बसुन न्यायदानाचे मौलिक कार्य पार पाडले. सदर खुर्ची सध्याच्या तहसिलदार कार्यालयात मोठया भक्तीभावाने जतन करुन ठेवण्यात आली आहे. खुर्चीची सेवा तहसिलदार कार्यालयात होत असते. जे तहसिलदार येथे बदलुन येतात त्यांच्या हस्ते महाराजांच्या पादुकांची व रथाची यथासांग पुजा केली जाते.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2018 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation