|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| श्री सदगुरु शंकर महाराज ||

नाशिक येथील सटाणा तालुक्यातील अंतापुर गावातील चिमणाजी नावाच्या गरीब निपुत्रिक शिवभक्तास सोमवारच्या भल्या पहाटे श्री शंकराने दृष्टांत दिला व सांगितले गावच्या झाडीत दावल मलिकच्या पायथ्याशी तुला एक बालक सापडेल. त्याला घेऊन ये त्या पती पत्नीने अंधारातच धाव घेतली व बालकाला घरी आणले. श्री शंकराचा प्रसाद म्हणुन नाव शंकर ठेवले. शंकर महाराज घर सोडुन जावयास निघाले. पुत्र वियोगाने माता दुःखी झाली. मातेला आशिर्वाद दिला. दोन पुत्र झाले. मग देवतुल्य बालकाने घर सोडले. केदारनाथ, बद्रिनाथ, प्रयाग करुन पंढरपुरला आले. वाळवंटात श्री स्वामी समर्थांची भेट झाली व त्यांच्या सोबत सोलापुरातील शुभराय मठात गुरुसमवेत ३ वर्षे राहीले. त्यांचे बाह्य शरीर आठ ठिकाणी वाकडे, मोठे टपोरे डोळे, तेजस्वी चेहरा बाल भावाने तळपत असे ! आजानुबाहु हात गुडघ्याच्या खाली पोहोचत असत कधी सर्वच बोटात अंगठया. गळ्यात कंठा, तर कधी सर्वस्व दान देऊन दिगंबर अवस्थेत अशा विविध रुपात ते वावरत नंतर ते सातपुडा पर्वताच्या भागात काही काळ "सुपडयाबाबा" म्हणुन वास्तव्य करुन राहीले.

१९३० साली भक्तांच्या इच्छेखातर १७ वर्षे आपली समाधीची वेळ पुढे नेऊन दाखवली. मी इथेच राहणार आहे. मला इथेच येऊन भेटा असे सांगितले. सोमवारी २४ एप्रिल १९४७ रोजी महाराजांचा देह समाधीत ठेवला. अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह श्री सदगुरु शंकर महाराज की जय ! असा नाद आसमंतात निनादला. महानिर्वाणापुर्वी महाराजांनी सांगितले. माझे काही करु नका माझ्या गुरुचा जप करा.

श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ ||

हा जप अखंड करा. मी व माझा गुरु वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करील त्याच्या मागे पुढे मी असेन. माझे फक्त स्मरण केल्यास त्यांची सर्व कामे मी करीन व माझी प्रचीती देईन. आपले श्रेष्ठत्व आपल्या गुरुचरणी वाहणारा एकमेव संत श्री सदगुरु शंकर महाराज खरोखरच धन्य होय.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation