|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

गजानन महाराजांना प्रचिती

नासिकला येऊन गजानन महाराज गंगाघाटावर बसले. कपालेश्वराचे दर्शन घेऊन प्रभुरामचंद्राकडे कुशल सांगितले. कोदंडधारी रघुकुलभषण सौमित्रागज वैदेहीनाथ प्रभुला फार आनंद झाला. बाबांनी मस्तक ती तांबडी फुले मस्तकाजवळ आली. मंदिरातील घंटा बाबांनी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आपोआप वाजली. अचानक मंदिराच्या गाभा-यातुन प्रकाशझोत निघून बाबांच्या डोळ्यात प्रवेश करुन गेला. यावरुन ही महान विभुती असली पाहिजे असा विचार करुन पुजारी त्वरीत बाहेर आला व त्याने बाबांचे दर्शन घेतले. बाबा गंगा ओलांडुन डोंगर उतारावर आले. समर्थांच्या आज्ञेप्रमाणे ते देवमामलेदाराकडे जाऊ लागले. त्यांनी महाराजांचे चिंतन केले. व प्रसाद हाराची दुकाने ओलांडुन ते जानप्पाच्या वाडयाजवळ आले. समोर ओटयावर देवमामलेदार बसलेले होते. समर्थांनी सांगितले होते की नमस्कार करताच तो मामलेदार तुला ओळखेल, पण येथे तर तसे काहीच दिसत नव्हते. समर्थांचे शब्द कालत्रयी असत्य होणार नाहीत. आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ? असा बाबांचा विचार चालु होता. काही न बोलताच निघुन जावे. असे ठरवुन ते महाराजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी ते उभे राहीले. जणु काही अखेरचा नमस्कार करायचा होता ! मान किंचीत लवताच ते बाबांच्या खांद्याला धरुन म्हणाले, "नका देवा पाया नका पडु गुरुबंधुला अलिंगन द्यावयाचे असते." अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री सदगुरु समर्थांनी नामग्रामातीत केल्यावर आता अंतर कसले ? थोडी घासुन घेण्याची समर्थांची आज्ञा आहे एवढेच ! महाराज बाबांना कडकडुन भेटले. बाबांना खुप आनंद झाला. समर्थांचे शब्द त्रिकालबाधित सत्य होते. व त्यांची जागाही बरोबर होती चुकली नव्हती.

|| आदिश्री फाउंडेशन व श्री. नानासाहेब निंबाजी पगार यांच्यातर्फे “देवमामलेदार” हे संकेतस्थळ संतशिरोमणी देवमामलेदार राजमान्य राजाधिराज योगीराज श्री यशवंतराव महाराजांच्या चरणी अर्पण.||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation