|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| देवमामलेदार ||

संपुर्ण नाव :- श्री यशवंतराव महादेव भोसेकर
मुळगाव :- करकम) भोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर
वडिलांचे नाव :- श्री महादेव धोंडोपंत भोसेकर
आईचे नाव :- सौ हरिदेवी किंवा हिराबाई
भावंडे :- ८ भाऊ १ बहिण
१. वडिल भाऊ (दादा) २. यशवंत
३. मनोहर ४. आबा
५. रामचंद्र ६.प्रल्हाद
७. वासुदेव ८. बलराम
९. बहिण - सखुबाई
असे होते महाराजांचे कुटुंब
पत्नीचे नाव :- सौ सुंदराबाई किंवा रुख्मिनीबाई(आई)
गुरुंचे नाव :- श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
जन्म तीथी :- शालीवाहन शके १७३७, भाद्रपद शुध्ददशमी बुधवार सुर्योदय
जन्म तारीख :- १३ सप्टेंबर १८१५
सुंदराबाईंच्या वडिलांचे नाव :- जीवाजी बापुजी देशपांडे
लग्नाची तीथी :- शके १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी सुंदराबाई त्यावेळेस ६ वर्षाच्या होत्या लग्नात ७५० रु. वर दक्षिणा दिली. ती सर्व रक्कम अन्नदानात खर्च केली
महाराजांचा परिवार :- तीन पुत्र व एक कन्या पण......ती सर्व तीन महिन्यापेक्षा अधिक जगली नाहीत.

महाराजांचे जन्मस्थळ :- पुणे ओंकारवाडा
सटाण्यातील यात्रेची सुरुवात व पादुकांची स्थापना :- १९ डिसेंबर १९१९ मध्ये
सटाण्यातील वास्तव्य :- सप्टेंबर १८६८ ते १८७३ पर्यंत ५ ते ६ वर्षाचा काळ
सटाण्यातील खजिना वाटला :- गोरगरिबांसाठी सन १८७०-७१ साली १ लाख २७ हजार रु. वाटले तो खजिना पांडुरंग व स्वामी समर्थांच्या कृपेने भरलेला निघाला.
महाराजांचे वैकुंठगमण :- मृत्यु - मार्गशीर्ष वद्य एकादशी, ११ डिसेंबर १८८७ रविवार रोजी सकाळी ६ वाजता नाशिक गोदावरी काठी.
देवमामलेदार हे शब्द म्हणजे सात अक्षारांचा मंत्र त्यांच्या स्मरणात भक्तीची प्रेरणा आहे जो त्यांना भजेल त्यांच्या जीवनात ते आधारवाड बनतील! सामान्य माणसांचा संतच आधार आहेत संत माणुसकी स्वत:त घडवितात आणि जडवितात हेच संत मामलेदारांनी केले त्यांची मामलती म्हणजे सर्वांना न्याय होता, जराही भ्रष्टाचाराला वाव नव्हता त्यामुळे शिष्टाचारांनाही तोच न्याय जो गोरगरिबांना न्याय असे यशवंतराव देव बनले ! देवाचे सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान त्यांच्यात प्रगट झाले आशा देव माणसाच्या किंवा देवपुरुषाच्या चरणी आमचे सदैव वंदन !! जे मनात तेच आचरणात, तेच संसारात आणि तेच नोकरीत हा सिध्दांत त्यांच्या जीवनात अखंड होता वरिष्ठांशी नम्रपणे वागणारा हा मुलुखावेगळा मामलेदार कनिष्ठांनी विनयाने वागत असे अधिकाराचा गर्व नाही कुणाला दमबाजी नाही आणि कुणावर अन्याय नाही अशी ही देवमुर्ती ज्या न्यायासनावर बसत असे ते धन्य होय ! न्यायादानाच्या कामात देखील त्यांनी आपली मामलतदार व संत्वन यांची अजोड समन्वय साधला होता.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation