|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ८ ||

"श्री यशवंत देवाने काशीच्या गंगेच्या कावड, रामेश्वर गाढवाला पाजली व जीवनदान दिले."

एकदा रणरणत्या उन्हात महाराज कचेरीत निघाले असता वाटेत एक गाढव कासावीस झालेले त्यांना दिसले ते लगेच जवळ गेले त्याला उठता येत नव्हते महाराजांनी त्याला पाणी पाजले. हळुहळू उठवुन बसविले व रस्त्याच्या बाजुला झाडांच्या गर्द सावलीत त्याला नेले तिथे त्याला त्यांनी चारा व पुन: पाणी दिले व मग कचेरिला गेले सायंकाळी ते परत येईपर्यंत तो मुकां तेथेच बसुन होता महाराजांनी त्याला घरी आणुन त्याच्यासाठी झोपडी बांधली दररोज त्याला चारा-पाणी देवुन त्याची देखभाल केली सुमारे महिनाभरानंतर ते भक्तजनांशी बोलत असतांना त्यांना विशिष्ट जाणीव झाली व ते लगेच उठुन आत गेले दररोजच्या पुजेत वापरत असलेले पवित्र गंगाजल घेऊन ते गर्दभास नेवुन पाजले पवित्र भागीरथीचे तीर्थ पिऊन त्याने महराजांच्या मांडिवर मान ठेवली आणि त्याच्या हालचाली थांबल्या, यातना संपल्या महराजांनी हळुवारपणे त्याचे डोळे बंद केले सर्व जीवसमभावाचा हा जिवंत पुरावा पाहुन सिंदखेडकर भक्त महराजांना म्हणाले,- "महाराज आपण तर सक्षात दयाघन आहात!" असा हा "वसुधैव कुटूंबकम" चा प्रत्यक्षदर्शी महामानव लाखो लोकांच्या भक्ती प्रेमास व श्रद्धेस पात्र ठरला होता

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation