|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ७ ||

"कावडी बाबानेश्री यशवंत देवाचा अभिषेक गंगेच्या वाळवंटात केला."

माघ पौर्णिमेच्या दरम्यान कावडी बाबा शहाद्यास पोहचला थोड्याचवेळात तो महाराजांच्या घरी पोहचला महाराज कचेरीतुन येईपोवेतो त्याने अल्पोपहार घेऊन विश्रांती घेतली विश्रांती घेऊन तो उठला तेव्हा महाराजांना सांगितली महाराज शांतपणे म्हणाले - बाबा ही तुमची श्रध्दा आहे. परमेश्वराने मला ती उपमा दिली एवढेच! मी तर एक सामान्य माणुस! तुम्ही पुण्यवान भूदेव! माझ्या गरिबाच्या घरी आपली पायधुळ झाडून तुम्ही माझे घर पावन केले तुमची सेवा माझ्या हातून घडो एवढीच इच्छा आहे. आता हवे तितके दिवस थांबून आमची सेवा घ्यावी. कवडी बाबाला गहिवरुन आले डोके टेकवून कावडी बाबाला म्हणाला महाराज तुम्ही प्रत्यक्ष देवच आहात तुमची किर्ती दाहीदिशा ओलांडुन स्वर्गातील देवांच्या मुखी झाली आहे. मी काय आपल्याकडुन सेवा घेणार? हे भगवान रामेश्वरा मी आणलेली गंगा स्वीकारा व मला पावन करा अशी या पामराची नम्र प्रार्थना आहे.; महाराजांनी हात जोडले व म्हणाले ,-"सर्वेश्वराच्या आज्ञेचा भंग आम्ही कसा करु.? तुमची इच्छा असेल तसे करावे मात्र तुम्ही काही दिवस इथे अतिथ्य स्वीकारावे" कावडी बाबांचा चेहरा उजळून निघाला तो आनंदने नाचु लागला वाड्यातील गर्दी वाढू लागली लोक आनंदाने "यशवंतराव महाराज की जय " च घोष करु लागले कावडी बाबाच्या दृष्टांताची वार्ता शहादे गावात व आजुबाजूच्या परिसरात पसरली महाराजांच्या वड्यावर लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या महशिवरात्रीच्या दिवशी कावडी बाबाने मोठा ऊत्सव केला. कावडी बाबांचा चेहरा उजळून निघाला तो आनंदने नाचु लागला वाड्यातील गर्दी वाढू लागली लोक आनंदाने "यशवंतराव महाराज की जय " च घोष करु लागले.

कावडी बाबाच्या दृष्टांताची वार्ता शहादे गावात व आजुबाजूच्या परिसरात पसरली महाराजांच्या वड्यावर लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या महशिवरात्रीच्या दिवशी कावडी बाबाने मोठा ऊत्सव केला महाराजांना सवादय मिरवणुकीने नदीवर आणले नदीत मंडप उभरला होता विद्वान ब्राम्हण वेदमंत्र म्हणत होते एकां सुशोभित चौरंगावर त्याने महाराजांना बसविले जवळ कावड घेतली तिची पुजा करुन ती हातात धरली बिल्व-पत्रांनी त्याने कावडीतील पवित्र जल महाराजांच्या मस्तकावर सिंचन करण्यास सुरुवात केली आणि मुखाने रुद्राध्याय म्हणू लागला ते पाहुन इतर ब्राम्हणही रुद्रमंत्र म्हणू लागले महाराज सस्म्ति वदनाने बसले होते थोड्याच वेळात कावडी बाबाने पहिले आवर्तन पुर्ण केले व दुसरे सुरु केले तो महाराजांच्या मुखाकडे एकटक बघत होता बघता बघता महाराजांच्या चेहरा नाहीसा होऊन स्वप्नातील रुद्राक्षमालाधारी तेजस्वी चेहरा दिसु लागला मधुनच दिव्य शंखध्वनी त्याला ऐकु येऊ लागला त्याने अत्यानंदने दुसरे आवर्तन संपविले मग तिसरे सुरु झाले आणि त्याला समोर चौरंगावर दिसले दिव्य लिंग! त्यावर असंख्य जलधारा .! त्याने कृतकृत्ये होऊन आवर्तने संपविले मग चौथे पाचवे. एकामागुन एक आवर्तन पुर्ण होत होती आणि त्याला महाराजांच्या बदलत्या स्वरुपाची प्रचिती येत होती शेवटी अकरावे आवर्तन पुर्ण करुन त्याने कावडीतील तीर्थ हळूहळू महाराजांच्या मस्तकावर ओतले कावड बाजूला ठेवली व त्यांच्या पायावर डोके ठेवुन चरण पकडले काही वेळ तो त्याच अवस्थेत होता एकामागुन एक आवर्तन पुर्ण होत होती आणि त्याला महाराजांच्या बदलत्या स्वरुपाची प्रचिती येत होती शेवटी अकरावे आवर्तन पुर्ण करुन त्याने कावडीतील तीर्थ हळूहळू महाराजांच्या मस्तकावर ओतले कावड बाजूला ठेवली व त्यांच्या पायावर डोके ठेवुन चरण पकडले काही वेळ तो त्याच अवस्थेत होता देवा मी आज कृतार्थ झालो बारा वर्षांची तपश्चर्या फळास आली आज रामेश्वराचे दर्शन झाले आणि जीवनाचे सार्थक झाले आता मी सुखाने प्राण सोडीन देवा माझ्या सर्व ईच्छा पुर्ण झाल्या त्याच अवस्थेत कावडी बाबाने उत्तर दिले काही वेळाने त्याने महाराजांचे पाय सोडले व पुढे पुजा करु लागला पाद्य अर्ध्य, आचमन, यज्ञोपवित, वस्त्रे, सुगंध, फुले, धुप, दिप, आरती, मंत्रपुष्पंजली इ. विधीयुक्त अर्पण करुन त्याने भक्ती व पुजेची हौस फेडुन घेतली त्याची तीही एक इच्छाच होती आणि महाराजांनी ती पुर्ण केली त्यांनी त्याला व इतर उपस्थितांना नमस्कार करुन नम्रोत्तर केले महाराजांची ती अमृतवाणी कावडी बाबाने कर्णरंध्रांद्वारे अंत:करणात साठविली नंतर जयजयकाराच्या निनादात सर्वजण महाराजांच्या वाड्यावर आले तेथे सर्वाना भोजन व दक्षिणा देण्यात आली सर्वाजण भोजन व दक्षिणा देण्यात आली सर्वजण तृप्त झाले व आनंदाने आपापल्या घरी गेले महाराजांनी कावडीबाबाला भोजनानंतर निरोप दिला त्याला बरोबर काही शिधा व वाटखर्चाचे पैसे दिले तो पुर्ण समाधानाने मार्गी लागला.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation