|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ६ ||

"श्री यशवंत कृपेने,रौद्र समुद्र शांत झाला"

दि.१७ ऑक्टोबर १८६३ रोजी महाराज मुंबईस निघाले माता,पिता, बंधु व काही सज्जन ब्राम्हण आणि काळु नावाचा शिपाई एवढा लवाजमा घेऊन महाराज बैलगाड्यांनी चाळीसगावी आले. तिथून मुंबईस आगगाडीने आले मुंबईस ते श्री गोविंद अप्पा हरी वाळवेकर यांच्याकडे आले वाळवेकरांची महाराजांवर अपार श्रध्दा होती महाराज आपल्या घरी आले ही त्यांना पर्वणीच वाटली त्यांनी आनंदोत्सव साजरा केला!

तिथून मुंबईस आगगाडीने आले मुंबईस ते श्री गोविंद अप्पा हरी वाळवेकर यांच्याकडे आले वाळवेकरांची महाराजांवर अपार श्रध्दा होती महाराज आपल्या घरी आले ही त्यांना पर्वणीच वाटली त्यांनी आनंदोत्सव साजरा केला! महाराजांनी यथासांग पुजा केली बरोबरच्या मंडळींचीही चांगली बडदास्त ठेवली महाराजांनी वाळवेकरांना आपल्या मुंबईभेटीचे प्रयोजन सांगितले वाळवेकर म्हणाले,-"देवा तुमच्याच कृपेने आम्ही मोठे आहोत हवी ती मदत मी केव्हाही देईन वाळवेकर मोठ्या मनाची माणसे तुम्ही ! नारायणाच्या कृपेने तुमचे मोठेपण वाढत जावो" महाराज आशिर्वाद देऊन म्हणाले. एलिससाहेब घो घो बंदरात होते सहा सात दिवसांचा बोटीचा प्रवास करावा लागे तीन दिवस वाळवेकरांकडे मुक्काम करुन चौथे दिवशी महाराज घो घो बंदराकडे निघाले महादेवपंत, हरीदेवी व महाराजांचे बंधु वाळवेकरांकडे थांबले काळुराम शिपाई व दोन ब्राम्हण नोकर यांचेसह महराजांचा बोटीने प्रवास सुरु झाला अथांग सागराच्या सहवासात महाराज रमु लागले वर निळे आकाश व सभोवतली निळा सागर ! परमात्म्याने किती विशाल रुप या चर्मचक्षूंना दिले आहे. थोड्याच वेळात समुद्रात रौद्ररुप धारण केले दोन दिवस वादळने थैमान घातले सर्वजण जीव मुठीत धरुन बसले होते पण महाराज शांतपणे त्यांची नित्यकर्मे करुन ऊरलेला वेळ नामस्मरणात घालवत होते तिसर्यात दिवशी वादळ शांत झाले सर्वांना हायसे वाटले सातव्या दिवशी बोट घो घो बंदराला लागली शंभुप्रसाद नावाचे सज्जन गृहस्थ व घोघोचे मामलेदारसाहेब यांनी महाराजांच्या मुक्कामाची सोय लावुन दिली करुणार्द्र नेत्र, तेजस्वी मुखमंडळ व नम्र भाषा या महाराजांच्या प्रसन्न दर्शनाने दोघेही प्रभावित झाले होते.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation