|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ५ ||

"श्री स्वामी समर्थ व श्री सखाराम महाराज संवाद श्री सखाराम महाराज समर्थास विनवितात, श्री यशवंत देवास राजीनामा परत घेण्याची आज्ञा करावी."

यशवंतराव महाराज राजीनामा देऊन एक महिना झाला होता. भोळया भक्तांना त्याचे काहि वाटत नव्हते. पण आजूबाजूच्या प्रतिष्ठीत व सज्जन लोकांना हे बरे वाटले नाही. त्यानी महाराजांना राजीनामा परत घेण्याविषयी विनंती केली. महाराज म्हणाले – नको आता नौकरीच्या मायेत अडकायला, सज्जनांचा नाईलाज झाला ते निघुन गेले.

महाराजांनी गर्दीचा परामर्श घेतला. सर्व काही व्यवस्थित आहे असे पाहून ते देवघरात आले. त्यानी नरसिंहदेवापुढे आणि सदगुरुच्या प्रतिमेसमोर मस्तक टेकले. क्षणभर भ्रुमध्यासमोरील प्रकाशवलयात हिरव्या हिरव्या जांभळया छटा आल्या. समर्थांचा चेहरा दृग्गोचर झाला आणि शब्द ऐकु आले. पळपुटा कुठला, बस्स आणि सर्व पुर्ववत झाले. महाराजांनी बाहेर येऊन कपडे घातले. पायात जोडे घातले. आणि वाडयाबाहेर पडले. त्यांचे पाय नकळत राममंदिराकडे वळले. रस्त्याने लोक अधुनमधुन पुढे येऊन दर्शन घेत होते. महाराज सस्मित वदनाने हात जोडुन प्रतिनमस्कार करित होते. मात्र कुणाशीही बोलत नव्हते. त्यांच्या कानात अजुनही पळपुटा कुठला ! हे उदगार घुमत होते. पावले मंद झाली राममंदिर आले होते. त्यांनी जोडे काढले. रामरायाचे दर्शन घेतले. मंद प्रदक्षिणा केल्या मंदिरासमोर येऊन अंमळ विसावले कामात घुमणारे शब्द मनात गर्दी करु लागले. मन अस्वस्थ झाले. विचारचक्र सुरु झाले. महाराजांनी मनाशी निश्चय केला. मी खटपट करीन नौकरी परत मिळवीन मी राजीनामा दिला आहे. बाण हातुन सुटला आहे. तो आता परत कसा येणार ? पण मी तो बाण निष्प्रभ करीन...मला ते केलेच पाहिजे...महाराजांना आता ताजेतवाने वाटु लागले ते घरी आले. दिवेलागणीची वेळ झाली होती. त्यांनी नित्यकर्म उरकून महादेवपंतांना व हरिदेवींना काय हवे नको ते बघितले. थोडावेळ बंधुशी बोलले.आणि बैठकीवर येऊन कागद अन लिखाण साहित्य पुढे घेऊन बसले. दोन घटका महाराज लिहीत होते. त्यांनी दोन पत्र लिहीले होती. पहिले पत्र लिहीले होते उत्तर प्रांताचे रेव्हेन्यु कमिश्नर एलिससाहेबांना आपण दिलेला राजीनामा परत घेत असुन तो मंजुर करण्यात येऊ नये अशी विनंती त्यात केली होती. दुसरे पत्र वैयक्तिकरीत्या मँन्सफिस्डसाहेबांना लिहिले होते.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation