|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ४ ||

"श्री यशवंतराव महाराज यांनी गरीब स्त्रीला अतिआदरे पैठणी नेसायला दिली."

दुपारची वेळ होती. संत रावसाहेबांनी आलेल्या अतिथी व याचकांना भोजन दिले. व ते स्वतःच भोजनास बसणार होते.. तेवढयात त्यांना कुणीतरी वाडयाकडे येत असल्याचे दिसले...ते एक जोडपे होते.

महाराजांनी दृष्टी सरळ केली. ते दोघेही वाडयात पोहोचले होते. महाराज पुढे झाले. त्या दोघांनीही डोळे भरुन पाहिले. पायावर डोके ठेवले व पुन्हा उभे राहुन ते रुप डोळयातून मनात भरुन ठेवू लागले. महाराजांनी दोघांनाही पाटावर बसविले. थंड पाणी व थोडा गुळ दिला. मीठ पाण्यात टाकुन त्या पाण्याने त्यांना हातपाय धुण्यास सांगितले. पाण्याने पायातील थकवा पुष्कळसा कमी झाला. लगेच त्यांच्या जेवणाची तयारी सुरु झाली. जेवणापुर्वी दोघांनाही स्नान घातले. पण त्या ब्राम्हण स्त्रीजवळ दुसरे वस्त्र नव्हते. तिने अंगावर पदर पिळला व तशीच जेवणास पानावर येऊन बसली. महाराजांनी ते पाहिले. लगेच ते उठुन आत गेले. पुष्कळ शोधाशोध केली पण एक ही सोवळे वस्त्र शिल्लक नव्हते क्षणभर ते सुन्न झाले. पण क्षणभरच ? आणि मग ते आपल्या घरात गेले. सुंदराबाईचा जपुन ठेवलेला भरजरी पीतांबर होता. तो त्या स्त्रीस नेसण्यास दिला त्यांना यथेच्छ भोजन दिले. भोजनानंतर त्या स्त्रीला नेहमीच्या वापरासाठी दुसरे वस्त्र दिले. त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली आणि मग महाराजांनी भोजन केले. दुसरे दिवशी ते परत निघाले. महाराजांनी त्यांना जवळ बोलाविले. व त्यांना दक्षिणा दिली. दक्षिणेत चांदिच्या दहा राजमुद्रा होत्या. ते दांपत्य हरपुन गेले. त्यांच्या मुखातुन शब्द फुटेना. पूर्ण समाधानी अंतकरणाने ते आपल्या गावी गेले. "माणूस माणसाला माणसासारखी वागणूक देतांना आम्ही पुषकळ पाहिले. पण माणसाला देवासारखी वागणूक देणारा देव आज आम्ही पाहिला" असे भेटेल त्याला ते सागुं लागले.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation