|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ३||

"श्री यशवंतराव महाराज चाळीसगावचे मामलेदार झाले."

१८५१ सालात महाराजांची बढती झाली. दप्तरदार कचेरीतील रावबहादुर रामचंद्र अंबादास उपाख्य गुरुजी पेन्शनात गेल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर महाराजांची नेमणुक झाली. पगार वाढुन रु. ४५ झाला. वरिष्ठांकडुन प्रशंसा होत होती. सहकारी वर्गाकडुन आपुलकी मिळत होती. समर्थांचे सुखद दृष्टांत होत होते. दत्तात्रयेचा ऐक्य सिद्धांत उपासनेतुन ओसंडुन वहात होता. माता, पिता, याचक, अतिथी यांची सेवा घडत होती. सन १८५३ मध्ये दप्तरदार म्हणुन प्रशंसनीय काम केल्याचा अहवाल कलेक्टरसाहेबांकडे गेला. आणि महाराजांना हुकुम मिळाला चाळीसगाव येथे रुजु होण्याचा ! चाळीसगाव सुभ्याचे मामलेदार म्हणुन ! भार, कारभार, अधिकार यात झालेली वाढ ! ८० रु पगार झाला तरी मागे काही शिल्लक ठेवली नाही. जे मिळते ते नारायणाच्या कृपेने, मग ते जाऊ दे नारायणाकडे तो सर्वाभूती आहे. मग जाऊ दे ते अन्नाच्या रुपाने, दानाच्या रुपाने, मदतीच्या रुपाने, नरातील नारायणाकडे, कधी कधी थोडे बहुत कर्जही होत असेय पण कर्ज घेणाराही तोच, धर्मासाठी खर्च करणाराही तोच, स्वीकारणाराही तोच व फेडणाराही तोच या अनुभूतीमुळे महाराजांनी कधीही फिकीर केली नाही.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation