|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय २१ ||

"आम्ही जातो आमुच्या गावा."

परमार्थाला जीवन वाहुन घेतल्यामुळे महाराजांना उसंत अशी ठाउक नव्हती. त्यातही गंगास्नान, श्रीरामदर्शन, प्रदक्षिणा, दान धर्म, अन्नदान यामुळे फार दगदग होई. अन्नदानाच्या पुण्यकर्मात हैद्राबाद, ग्वाल्हेर, पुणे इ. ठिकाणाहुन मदत होत असे महाराज रात्री बेरात्री येणारे याचक, गोरगरिब यांचाही कंटाळा करित नव्हते. महाराजांसमोर माधव नारायण देशपांडे जवळ जवळ वीस वर्षापासुन महाराजांची जमेल तशी सेवा करुन संत सहवासाचा मेवा घेत होते ते महाराजांना म्हणाले, "महाराज गावी जरा वतनाचे काम निघाले आहे. चार दोन महिने तिकडे थांबुन सगळे व्यवस्थित लावावी म्हणतो आपली आज्ञा व्हावी." "इतकी वर्ष प्रेमाने व स्नेहाने आमच्या बरोबर राहिलात, देवा, आता सात आठ महिन्याकरिता कां आम्हाला अंतर देता? माधवपंतांच्या काळजात धस्स झाले महाराजांच्या सहवासात राहिल्याने त्यांना महाराजांच्या तुटक शब्दांचाही रोख व अन्वय ओळखता येत असे त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला महाराजांचे वाक्य त्यांचे काळीज कापुन गेले "सात आठ महिन्यानंतर ?"महाराज यापुर्वी कधीच असे बोलले नव्हते मनातल्या मनात त्यांनी शब्द उलट सुलट क्रमाने फिरवुन पाहिले पण त्यातुन दुसरा अर्थ निघत नव्हता सात आठ महिन्यांनी महाराज ...पुढचा महाभयंकर विचार करायला त्यांचे मन धजावत नव्हते पण दुसरा कोणता विचार येत नव्हता.काही दिवसानंतर महाराजांना जास्त अशक्तपणा वाटु लागला महाराज आजारी असल्याची बातमी गावोगावी गेली लोकांचे थवे दर्शनाला येवु लागले महाराजांच्या अगदी जवळ कोणाला जाता येत नव्हते पण महाराज त्यांच्याकडे कृपाकटाक्ष टाकीत व ते समाधान पावुन परत जात महाराज शांतपणे टेकुन अर्धोन्मिलीत नेत्रांनी स्थीरपणे पहात असत अन्न पुर्णपणे त्यांनी वर्ज्य केले गंगोदक व देवतीर्थ फक्त प्राशन करित. महाराजांना सर्व कुटुंबीय वेष्टुन बसत असत हळुहळु पण स्थिर दृष्टि ठेवुन ते बोलत दिनांक १० डिसेंबर १८८७ मार्गशीर्ष वद्य दशमीला महाराजांची तब्बेत आणखी खालावली त्यांना ग्लानी येऊ लागली

वैद्य बिवलकर व आणखी चार वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करित होते पण उपचाराला प्रतिसाद नव्हता तरिही महाराज शांतचित्त होते खुणा करुन व्यवस्थित सुचना करुन व्यवस्थित सुचना देत होते त्या दिवशी त्यांनी ब्रम्हवृंदांना पाचारण केले दोनशेहुन अधिक ब्राम्हणांना दक्षिणा दिली व त्यांना नमस्कार करुन त्यांचे आशिर्वाद घेतले नंतर शांतचित्ताने डोळे मिटुन पडले तेव्हा दोन प्रहर झाली होती, आणखी दोन घटका गेल्या व त्रिदोष वाढल्याचे वैद्यराजांनी सांगितले. सुर्योदय होण्याच्या बेतात वैद्यराजांच्या सांगण्यावरुन महाराजांना माडीवरुन खाली आणण्यात आले सर्वजण खाली उभे होते मार्गशीर्ष वद्य एकादशी सुरु झाली होती ११ डिसेंबर सकाळ होऊ पहात होती सवीजिन्नाम संवत्सर या महामानवाने सर्व जगाला जिंकल्याची साक्ष देत होते आबासाहेब खाली मांडी घालुन बसले महाराजांचे ओठ हालत होते नामस्मरण चालु होते आबांनी हळुवारपणे महाराजांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले श्रीमद भगवत गीता यांचे पाठ चालु होते श्री नरहरीतीर्थ व गंगाजल मुख कमलात घालुन तुलसीदास ठेवले आणि सहस्त्रनामाच्या गंभीर ध्वनीत उगवत्या सुर्याच्या साक्षीने परोपकार यज्ञासाठी या भुतलावर आलेला हा दिव्य महात्मा ७२ वर्षाच्या यज्ञाची सांगता करुन उगवत्या सुर्याला साक्षी ठेवुनच वैकुंठाची वाट चालु लागला !!! एक तेजस्वी सुर्य अंतर्धान पावला !!!! एकच हल्लकोळ झाला हजारो मनांचे बांध फुटुन डोळ्यांवाटे वाहु लागले जनसागर शोक सागराशी एकरुप झाला सुंदरादेवी अतिशोकाने बेशुध्द झाल्या अशा प्रसंगी कोण कोणाला सावरणार.? ते काम वैद्यराजांनी केले त्यांनी शुध्दीवर आणण्याचे काम केले पण देवीचे शोक आवरण्याचे काम त्यांना करता आले नाही त्यांनाच शोक आवरत नव्हता ते काय सांत्वन करणार .? सुंदरादेवीच्या शोकाचा भर पाच घटकानंतर ओसरला त्यांनी महाराजांच्या आसनाकडे पाहुन म्हटले, महाराज माझे मागणे कधी पुर्ण करणार.?" मग त्यांनी अश्रु पुसले, चेहर्यातवरचे भाव बदलले दुखा:च्या छटा दुर झाल्या होत्या त्या घरात गेल्या व काही वेळाने बाहेर आल्या अंगावर पितांबर, हिरवी चोळी, कपाळावर कुंकु हातात हिरवी कंकणे अशा त्या सुहास्य वदनाने उभ्या होत्या त्यांचा चेहरा उजळुन निघाला होता त्यावर दिग्विजयाला निघालेल्या शुर विद्युल्ल्तेचे तेज होते पतिव्रत्याची तलवार तळपत होती वामनभाऊ व आबांनी हे पाहिले त्यांनी ओळखले की सुंदरादेवीने सती जाण्याची तयारी केली होती ते दोघेही जवळ आले व त्यांना कायद्याची जाणीव करुन दिली त्यांची समजुत घातली देवीच्या मुखावर म्लानता आली त्यांनी सौभाग्य भुषणे कढुन टाकली व पुन: दुर जावुन बसल्या. मोठ्या सम्राटाचा होणार नाही असा अंत्यविधी लाखो लोकांच्या अश्रुंच्या साक्षीने महाराजांचा गंगातीरावर झाला. भगवान नारायणाने सुंदरा देवींना फार काळ तिष्ठत ठेवले नाही बरोबर दोन महिन्यांनी कॉलराचे निमीत्त होऊन माघ वद्य एकादशीला मंगळवारी उष:काल समयी सुंदरादेवी इहलोक सोडुन पतीच्या भेटिसाठी अनंताकडे झेपावल्या समर्पीत पूर्णजीवन वर्तुळाचा उर्वरीत अर्धा भाग जोडला गेला हे शाश्वत मिलन पाहुन लक्ष्मीलाही हेवा वाटला असेल!

|| अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation