|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय २०||

"श्री दत्त महाराज यतिवेशाने आईसाहेबास नेत आहे."

एकदा चार-पाच जण महाराजांच्या चरणांचे दर्शन घेऊन बसले होते तेव्हा सेवक मध्येच महाराजांपुढे येऊन म्हणाला "सरकार बाहेर एक यतिराज आले आहेत. जटा बांधलेल्या, भगवीवस्त्रे, हातात फक्त कमंडलु असलेला साधु होता महाराजांनी कोणत्याही साधुपुरुषाला आदरतिथ्याविना परत जाऊ दिले नव्हते मुनी, जपी, तपी, यती, योगी यांना नमस्कार केल्यावाचुन उठु दिले नव्हते. महाराजांच्या जीवनक्रमाचा तो एक भाग बनुन गेलेला होता यतिराजांना आसनावर बसवुन महाराज म्हणाले "यतिराज आपली इच्छा सांगावी." "मला दान हवे आहे, इच्छा दान देणार असाल तर सांगतो, नाहीतर" "मुनीदेवा, आपली इच्छा सांगावी, आपली इच्छित दान वस्तु माझ्याजवळ असेल तर त्वरित ती देईन जर आमच्या घरात ती नसेल तर महाराज मला दोन तीन दिवस मुदत द्यावी मी ती प्राप्त करुन आपल्याला देईन "महाराजांनी नम्रपणे म्हटले"

"तर ऐक, एक दिवसासाठी मला तु तुझी पत्नी दे", यतिराजाने महाराजांच्या डोळ्याकडे धारदार नजरेने पाहुन म्हटले" घरात निरोप गेला महासती सुंदराबाई आल्या "अतिथी देवो भव" देवर्षीने मागितलेले दान आपल्या कृपेने देवुया "यतिराजांनी माझी पत्नी मागितली आहे. देवी तु यांच्याबरोबर जावे", महाराज एका दमात बोलुन गेले सुंदराबाईंना क्षणभर ब्रम्हांड उलटे गरगरत असल्यासारखे वाटले पण नंतरच्या क्षणी त्या म्हणाल्या ठिक आहे. मी लगेच निघते सुंदरादेवी देवघरात आल्या यतिराज बाहेर उभे होते जाण्याच्या पावित्र्यात! महासाध्वीने महाराजांच्या चरणावर मस्तक ठेविले त्याचबरोबर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्रही महाराजांच्या चरणावर काही क्षण विसावले होते नमस्कार करुन सुंदरादेवी यतिराजांपाठोपाठ चालु लागल्या महाराजांची मुद्रा पुर्वी प्रमाणेच प्रसन्न होती सहस्त्रनामाच्या स्मरणात येणार्यार मंडळींशी बोलत होते. इतक्यात सुंदरादेवी परत आल्या भक्तजनांना विसर पडलेला प्रसंग, यतिराज, इच्छादान. सर्व आठवले महाराज फक्त एवढेच म्हणाले "परत येण्यास काय कारण घडले ?" सुंदरादेवी सांगु लागल्या मी यतिराजांच्या पाठोपाठ निघाले आम्ही गंगेतुन जाऊ लागलो नदि ओलांडल्यावर घाई करुन त्यांच्या बरोबरीने चालु असा विचार केला नदी ओलांडली चढण पार करुन वर आले आजुबाजुला, समोर, रस्त्यावर पाहीले पण यतिराज दिसले नाही दिवस मावळु लागला अंधार पडु लागला, तशी मला चिंता वाटु लागली भीती वाटु लागली दिवेलागणीची वेळ झाली आणि चिंचबनातुन कोमल साद ऐकु आली साध्वी तुम्ही उभयता धन्य आहात माते पती सेवेत जा महाराजांनी डोळे झाकले व म्हणाले, "प्रभो आज कृतार्थ झालो, कितिदा तरी आपण वैकुंठ सोडुन आम्हा क्षुद्र जीवांसाठी कष्ट घेतले, सेवा केली आज आपण घरी येवुन दान मागितले आमची सेवा स्वीकारली आम्हा उभयतांना सुबुध्दी दिली, शक्ती दिली देवा परिक्षा घेतलीस तु ! उत्तीर्णही तुच केलेस !नव्हे आम्हास कृतार्थ केलेस जय जगन्नाथा, जगदभर्ता, लक्ष्मीपती नमो स्तुते ! महाराजांनी डोळे उघडले तेव्हा महासाध्वीने त्यांच्या पायावर डोके ठेवले होते सर्व भक्तजनांनी दोघांनाही प्राणिपात केला होता.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation