|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय २ ||

"श्री अक्कलकोट स्वामी चरणांचे, बाळ यशवंताला प्रथम दर्शन व बाळाचे पुर्णसमर्पण"."

महाराजांना एकदम ताजेतवाने वाटु लागले. महाराजांमधील हा बदल सर्वांना सुखद वाटला. त्या दिवसापासुन त्यांनी तो शाळीग्राम रोजच्या पुजेत ठेवला. "आता थोडी प्रतिक्षा मग फल....कोण मला अनुग्रह देणार? काय अनुभुती येणार ? ते महापुरुष कोण ? ते मला प्रत्यक्ष भेटतील का ? त्यांचे नाव कोणते ? खूण कोणती ? संप्रदाय कोणता?" असे नाना प्रश्न .यशवंतरावांच्या मनात येत. आता दिशाहीन तळमळ जाऊन आकाशदायी हुरहुर त्यांना लागली होती. थोडयाच दिवसानंतर त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला. शालीग्राम देणारे महापुरुष पुन्हा स्वप्नात आले. त्यांनी आज्ञा केली - "तो शाळीग्राम घेऊन आमच्या भेटीस यावे. आम्ही हल्ली मंगळवेढयास वास्तव्य करुन आहोत." महाराज जागे झाले. त्यांना आता चैन पडत नव्हती. त्यांचा अध्यात्म भाग्य वासरमणी उगवला होता. सदगुरुंनी आपला ठावठिकाणा सांगितला होता. आता उसंत घेऊन चालणार नव्हते. आगतांचा यथायोग्य परामर्श घेतला व रजा घेऊन शाळीग्रामासह मंगळवेढयाच्या वाटेला लागले.

परुपदी संगम पुर्ण झाला

मंगळवेढे जवळ येऊ लागले. तशी महाराजांची तळमळ वाढु लागली. गुरुमाऊली मला जवळ करिल काय ? की आणखी दुसराच मार्ग सांगेल ? त्यांच्याजवळ गर्दी असेल तर मला त्यांच्याजवळ जाता येईल का ? ते मला ओळखणार कसे ? अशा प्रकारचे विचार करत त्यांनी गावात पाऊल ठेवलाय तपास करीत ते एका वाडयात आले. समोर तो महापुरुष बसलेला होता. स्वप्नात दर्शन झाले त्याच अवस्थेत आताही तो बसलेला होता. तेच सिध्दासन, तेच अजानुबाहु. तिच भेदक नजर. तेच तेजस्वीनेत्र , तेच भव्य कपाळ ! महाराजांचे देहभान हरपले. तोंडातुन शब्द फुटेना ! अखेर ते भानावर आले ते स्वामींच्या शब्दांनी "काय रे तो नरसिंह शाळीग्राम आणलास का ? " महाराजांना अंतरीची खुण पटली त्यांनी विनम्रभावाने शाळीग्राम काढुन स्वामींच्या चरणावर देह झोकुन दिला. स्वामींनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकुन म्हंटले. "थांब तुझा मागचा रस्ता पुढे चालु करतो. " नंतर त्यांनी कपाळावर हात ठेवला आणि.... अनेक प्रकाशवलये कपाळातच असल्यासारखे वाटले. पाठीतुन खालच्या बाजुने वरपर्यंत वीज चमकून कपाळातील प्रकाशवलयात मिसळली. त्यात सर्व काही होते. आसमंत होते. पृथ्वी होती, देव होते, दानव होते, मानव होते, प्राणी होते, चराचर विश्व होते, हे सर्व होते. तरी ते "मी" वाचून नव्हते. मी ही स्वामी, स्वामीत मी, माझ्यात सर्व ! हा अनुभव अपुर्व होता. "अहं ब्रम्हास्मि...." महाराजांनी तथ्याला शब्दबद्ध केले. महाराजांनी स्वामींना सांगितले, देवा आज मी स्वामीमय झालो. अनाथाचा सनाथ झालो. "हे देवाधिदेव आज मी धन्य झालो साक्षात वैकुंठीचा राणाच गुरुदेव म्हणुन मिळाला हे नरसिंह देवा, नृसिंहसरस्वती, दत्तात्रेया पंढरीनाथा, स्वामी समर्था तुला कोटी कोटी ! प्रणाम !! " यशवंतरावांनी दोन दिवस भक्तीभावाने समर्थांची पुजा केली. नैवद्य दक्षिणा अर्पण केली. गावात अन्नदान व दानधर्म केले. नंतर स्वामींच्या चरणींची धुळ मस्तकाला लावुन आनंदभरित अंतकरणाने त्यांनी म्हंटले.

चराचरी व्यापकता जयाची
अखंड भेटी मजला तयाची
परंपदी संगम पूर्ण झाला
विसरु कसा मी गुरु पादुकांला

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation