|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १८ ||

"श्री कृपेने सीतारामल सहस्त्रदळी विवरात दर्शन घडले."

महाराजांच्या मुंबई मुक्कामात मुमुक्षुला महाराजांच्या कृपाप्रसादाची अवीट गोडी चाखावयास मिळाली सीताराम झिलु मयेकर हे त्याचे नाव सावंतवाडी संस्थानातील मालवण रस्त्यावरील सुकळवाड येथील हा तरुण चित्रकार व्यवसायानिमित्त मुंबईस आला होता.

संसाराच्या रामरगाड्याबरोबर रामनामाची धुनही त्याच्या पाठीशी होती नामस्मरण, भजनाची आवड यामुळे साहजिकच साधु संतांच्या दर्शनाचा छंदही सीतारामाच्या मनाला जडला होता महाराजांच्या पायावर डोके ठेवताच सीताराम ब्रम्ह्तन्मय स्थितीत जवळजवळ दिड घटकां होता "बाळ नारायणा स्वस्वरुपाच्या चिंतनात नारायण नामोच्चाराने अखंड आनंदाचा सतत स्वाद घे",महाराजांनी आशिर्वाद दिला. "हे देवाधिदेवा, आपणच नारायण स्वरुप आहात मी ही त्याचाच अंश असुन त्याचा नारायणत्वाचा सर्वव्यापी प्रत्यय आपले दर्शन घेतल्यापासुन येत आहे. हे गुरुमाऊली ह्या दसानुदासावर कुर्म दृष्टीने कृपा असु द्या, सीतारामाने प्रसादाची पावती दिली. महाराज हसुन म्हणाले, "रंगसंगती तर उत्तम जमली आहे, विसंगती कुठे दिसत नाही सप्तरंगांच्या विलक्षण रंगसंगतीने अविस्मरणिय व सर्वसुंदर चित्र तयार होते पण त्याही पुढे जाऊन सप्तरंगाच्या विलक्षण मिश्रणाने प्रकाशाचा रंग तयार होतो प्रकाशरुप परमात्मा तुझे सर्व जीवन आध्यात्म प्रकाशमान करो सप्तस्वरांच्या लयीत परमात्म्याचाचे एक सुर लागो सुधामृत सागरात श्रीगुरु माऊलीचे बोट धरुन अथांगतेचा व अनंतत्वाचा अनुभव घेत असल्याने सीतारामाला जाणवले पुन्हा एकदा सदगुरुंचे पाय धरुन चरणधुळ मस्तकाला लावली व चित्रकार आत्मचरिज्ञ होऊन बाहेर पडला घरी परततांना सीताराम महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाने पुर्णपणे भारावुन गेला होता सीतारामला अंतरीची खुण पटली होती सीताराम संसारात राहुनही ब्रम्हानंदात राहण्यासाठी पुढे वाटचाल करु लागला .

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2018 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation