|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १७ ||

"पानसे व सहस्त्रबुध्दे हे दोघे उकळत्या पाण्याने श्रीं ना स्नान घालुन आसुरी आनंद मिळवत होते."

पुण्याला असतांना महाराजांच्या देवपणाची प्रचिती त्यांच्या भक्तजनांना परत एकदा आली सहस्त्रबुध्दे व पानसे या दोन क्षुद्र विचारांच्या गृहस्थांना महाराजांना होणारा सत्कार, जयजयकार, दर्शनासाठी होणारी गर्दी पाहुन महाराजांच्या सात्विक वैभवाचा मत्सर वाटत असे त्यांनी कपट बुध्दीने एक भयंकर योजना आखुन महाराजांना शुक्रवार पेठेतील नातुच्या वाड्यात नेले."महाराज आपल्याला स्नान घालावे अशी आमची इच्छा आहे, तेवढी पुर्ण करावी म्हणजे श्रेष्ठ संतांची सेवा केल्याचे पुण्य आम्हाला लाभेल" असे म्हणुन त्यांनी महाराजांना चौकात चौरंगावर बसविले

बाहेर थांबलेली भक्त मंडळी संताच्या स्नानाचे तीर्थ आपल्या मस्तकी लागले तर आपण पावन होऊ ह्या दृढ श्रध्देने स्नानतीर्थ घेऊ लागले स्नानतीर्थ कढत असल्याने त्यांचे हात भाजले तो प्रकार पाहुन सर्वजण आत पळाले पाहातात तर काय महाराजांच्या अंगावर उकळ्ते पाणी ओतुन दोन नरराक्षस आसुरी आनंद मिळवित होते त्या दोघांनाही भक्तजनांनी झडप घालुन धरले तेव्हा त्यांची धुंदी उतरली त्या दोघांनाही बाहेर घालविल्यानंतर लोकांनी महाराजांना पाहिले तर त्यांचे सर्वांग भाजुन फोड आले होते पण ते शांत बसुन होते भक्तांनी त्वरीत हालचाल करुन तेथे वैद्य आणले वैद्यांनी महाराजांना लेप लावायला सुरुवात केली तेव्हा बाहेर कोलाहाल झाला गर्दीतुन महाराजांच्या समोर येऊन दोन जण जमिनीवर गडबडा लोळु लागले त्यांना कुणाकडे पाहण्याचे धैर्य नव्हते "महाराज आम्हाला वाचवा, आम्ही चुकलो, आम्ही अनंत अपराधी आहोत महाराज हा दाह थांबवा दोघेही जण जमिनीवर गडबडा लोळु लागले त्यांना कुणाकडे पाहण्याचे धैर्य नव्हते "महाराज आम्हाला वाचवा, आम्ही चुकलो, आम्ही अनंत अपराधी आहोत महाराज हादाह थांबवा आम्हाला जीवनदान द्या ! दोघे कपटी जीवाच्या आकांताने कळवळत होते. दया, क्षमा व शांती या अमोघ शस्त्रांनी मंडीत असलेल्या महाराजांनी त्या दोघांचा आक्रोश ऐकला त्यांनी लगेच पुजेतील तीर्थ त्यांना दिले व ते म्हणाले -"सज्जन विप्रांनो हे तिर्थ अंगाला लावा म्हणजे दाह शांत होईल पण एक प्रार्थना आहे. ती म्हणजे पुन: असा कठीण प्रसंग कुणाही प्राणिमात्रावर आणु नका" अर्धा पाऊण घटकेत दोघांनाही आराम पडला"दया, क्षमा व शांती यांनी शरीर धारण केले व भुलोकावर ते वावरु लागले आज ते आम्ही नातुंच्या वाड्यात याची देही याची डोळा पाहीले पुरोहितांनी असे म्हणुन महाराजांची पाद्यपुजा केली काही वेळानंतर महाराज मुक्कामी परत आले.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation