|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १६ ||

"श्री ची पालखीतुन शिंदे सरकार व ब्रिटीश गवर्नरने मोठी मिरवणुक काढली."

दोन दिवसांच्या वाढिव मुक्कमानंतर साहेब जिल्ह्याला जायला निघाले सर्व तयारी झाली, घोडा सज्ज ठेवलेला होता.साहेब घोड्याजवळ आले स्वार होणार तोच घोडा खाली पडला आणि पाय झाडु लागला नोकरांनी अनेक उपाय केले पण घोडा शांत होईना, गावातील जानकारांनी अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ !

सगळ्यांनाच पेच पडला चार घटका झाल्या तरी घोडा शांत होईना तेवढ्यात गर्दीतुन एक म्हातारा म्हणाला साहेब लहान तोंडी मोठा घास.. पण कसुर माफ करावा! घोडा अस्वस्थ होण्याचे कारण तुमच्याकडुन देवमामलेदारांचा अवमान झाला आहे. तुम्ही त्यांना विनंती केली तर सर्व ठिक होईल व तुम्ही सुखरुप जाऊ शकाल एवढे बोलुन तो आपले चमकदार डोळे लपवीत गर्दित मिसळला म्हतार्याएचे बोलणे साहेबांना पटले पण त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी कनिष्ठ नोकरांना विनंती केली नव्हती इथे तर तशीच वेळ आली होती हळु हळु त्यांच्या मनाची तयारी झाली व त्यांनी महाराजांना नोकर पाठविला नोकराने महाराजांना सर्व परिस्थीती सांगितली महाराज तेथे आले व त्याला थोपटुन स्वत:च्या हाताने उठवु लागले तेव्हा साहेबांच्या तोंडुन उद्गार निघाले - "शाब्बास, हे आश्चर्य मी जन्मभर विसरणार नाही." कारण घोडा ताडकन उभा राहीला होता आता मात्र साहेबांचा सगळा साहेबीपणा विरघळला होता त्यांनी महाराजांच्या पायावर डोके ठेवले व ते म्हणाले - "माफ करा मी तुम्हाला ओळखण्यात चुक केली, तुम्ही खरोखर देवपुरुष आहात." महाराजांचे पुन्हा एकदा आभार मानुन साहेब घोड्यावर स्वार झाले आणि सटाण्यात निरस्काराने पाउल ठेवणारे साहेब मनातस आश्चर्य, नम्रता, श्रध्दा व कौतुक साठवुन सटाण्याच्या बाहेर पडले. नंतर महाराज घरी परतले सवादय मिरवणुकीने महाराजांच्या घरी पोहचण्यास बराच उशीर झाला होता लोकांनी त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation