|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १५ ||

"साकोरीचे उपासनी महाराजांना, बालवयात श्री चरणी घातले, व मुंजीचे सादर आमंत्रण दिले."

एके दिवशी सकाळी महाराजांकडे गोविंदशास्त्री आपल्या मुलासह आले सटाण्याच्या वेदशास्त्रसंपन्न गोपाळशास्त्री उपासनीचे ते चिरंजीव होते महाराजांनी त्यांचा यथायोग्य आदरसत्कार केला.

गोविंद्शास्त्रांनी मुलांसह महाराजांचे दर्शन घेतले व आपल्या येण्याचा उद्देश सांगितला ते म्हणाले - हा आमचा काशिनाथ आता आठ वर्षांचा होईल तेव्हा त्याची मुंज करण्याचे योजिले आहे. त्या मंगलप्रसंगी उपस्थित राहुन त्याला त्याला शुभाशिर्वाद देऊन त्याच्या जीवनाचे सोने करावे अशी विनंती आहे. महाराज काशिनाथला जवळ घेऊन म्हणाले - मी अवश्य येईन मोठा भाग्यवान आहे आमचा बाळ. लवकरच शुभमुहुर्तावर काशिनाथचे उपनयन झाले समारंभास महाराज उपस्थित राहिले उपनयन संस्कार झाल्यावर काशिनाथने महाराजांचे दर्शन घेतले तेव्हा त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवुन महाराज म्हणाले "आयुष्यवंत हो काशिनाथ तु उपासनी हे नाम सार्थ करशील नारायणाच्या कृपेने तुझ्याकडुन जगध्दोराचे काम होईल धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थानंतर तुला वैराग्य प्राप्त होईल वैराग्याच्या अग्नित तप्त झाल्यावर तुला सदगुरुकडुन अनुग्रह मिळेल सदगुरु कृपेने अनुग्रह झाल्यावर तु लोकांच्या उध्दारार्थ सिध्द होशिल लोकोध्दाराचे कार्य सुरु केल्यावर तु आमच्या भेटीस या नगरी यावे आम्ही तुझी वाट पाहत इरावती माईच्या खांद्यावर शांतपणे बसलेलो असु. आता तु अध्ययन सुरु कर. अध्ययनानंतर गृहस्थाश्रम स्वीकार. मात्र रामनामाच्या सुराबरोबरच सगळे आयुष्य राहु दे. ॐ नमो नारायणा .." काशिनाथ निघुन गेल्यावर शास्त्रीबुवांना महाराज म्हणाले "शास्त्रीजी तुम्ही भाग्यवान आहात एका लोकोपकारी म्हात्म्याला जन्म दिला तुमच्या कुळाचे नाव जगात अजरामर होईल" "महाराज ही सगळी आपली कृपा ! नारायणाची कृपा! तो सर्वांनाच आपल्या कृपेने पावन करतो!"

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation