|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १४ ||

"श्री ची टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तांनी मिरवणुक काढली."

महाराजांच्या दैवी किर्तीचा ध्वज उंच उंच फडकु लागला त्यांच्या सहज लिलांचा सुगंध तर हजारो भक्तांना मिळत होता या दैवी व दिव्य महापुरुषाच्या दर्शनाने भक्तांचे तिन्ही ताप मिटत होते ही किर्ती ग्वाल्हेर संस्थानातही पोहचली ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंदे यांना महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली.

१८७२ मध्ये ते मुंबईस आले मुंबई सरकारकडे त्यांनी "देव मामलेदारांची भेट होईल तर फार बरे होईल असे उद्गार काढले आणि नाशिकच्या कलेक्टरसाहेबांना मुंबईहुन गव्हर्नर साहेबांनी हुकुम धाडला महाराज ग्वाल्हेर संस्थानात त्यांच्या भक्तजनांसह पोहचले महाराजांनी नित्यपुजा, भोजन व विश्रांती आटोपली तेव्हा हवेलीत शिंदे सरकारकडुन त्यांना घेण्यासाठी सरदार आले होते त्यांनी महाराजांना पालखीत बसविले भालदार, चोपदार काही सैनिक अशा लवाजम्यासह महाराज निघाले वाद्यांचा जयघोष होत होता ठिकठिकाणी पुष्पवृष्टी होत होती पालखी शिंदे सरकारच्या महालाजवळ आली तेव्हा सरकार स्वत:च पुढे आले व महाराजांचे दर्शन घेतले महाराजांना महालात आणुन त्यांचा शाही सत्कार केला शिंदे सरकारांनी स्वत: पाद्यपुजा करुन महाराजांचे आशिर्वाद घेतले महाराणीसाहेबांसहीत सर्व राजस्त्रीयांनी दर्शन घेतले. शिंदे सरकारने महाराजांच्या पायाशी धनाच्या राशीच ओतल्या ते म्हणाले "महाराज आपण हवे तेवढे धन घ्यावे कारण आपल्या हातुन ते स्पर्श होऊन गेल्याने स्वत: धन्य होईल व असंख्य जीव सुखी होतील आम्हालाही सात्विक आनंद होईल" "सरकार आपल्या औदार्याबद्दल म्या पामराने काय बोलावे? महाराज द्रव्य राशीला नमस्कार करीत म्हणाले- "नारायणाची ही कृपा ! हे धन मी स्वीकारले आहे पण माझी आठवण म्हणुन ते आपल्याकडे असु द्यावे नारायण जशी सुबुध्दी देईल त्याप्रमाणे ते दीन दुबळ्यांसाठी खर्च करावे अशी विनंती आहे.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation