|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १३||

"दुष्काळात श्रीने सटाण्याचा सरकारी खजिना गोर गरिबांना वाटला."

१८७०-७१ साल आले हे दुर्भिक्ष्य घेऊनच वरुणराजाच्या अवकृपेमुळे धान्य पिकले नाही पाणी आटुन गेले गोरगरिबांची उपासमार टाळण्यासाठी काही कुटुंबांनी गावही सोडली होती अशा परिस्थीतीत गरिब याचकाची गर्दी महाराजांच्या वाड्याकडे वाढु लागली सर्वांना तृप्त करण्यासाठी बरेचसे कर्जही त्यांना काढावे लागले आणि तो दिवस उजाडला महाराज सकाळी पुजा करुन बाहेर आले तर दरवाज्याजवळ दोन-अडिचशे याचक बसलेले होते कुणाला वस्त्र हवे होते, कुणाला औषध हवे होते, कुणाला अन्न हवे होते तर कुणाच्या मुलांना कपडे हवे होते त्यांची ती अवस्था पाहुन महाराजांचे मन कळवळले त्यांनी सर्वांना वाड्यात बसायला सांगितले आणि महाराज आत गेले दोन्ही पोत्यातले धान्य त्यांनी बाहेर काढले बाहेर येवुन त्यांनी ते सर्वांना वाटुन टाकले महाराजांनी सर्व घरातुन हिंडुन असेल नसेल ते सर्व बैठकीच्या खोलीत आणुन ठेवले धान्य धान्य , कपडे व वस्तु दोन घटकत संपुन गेल्या संपुर्ण निष्कंचन, निर्धन व निर्व्याज असे महाराज देव घरात बसले महाराजांचे विचारचक्र चालु होते मनाची तळमळ वाढतच होती. शेवटी महाराजांनी विचारचक्र थांबविले, कारण त्यांनी ठाम निर्णय घेतला होता आणि त्याची त्यांना आता अंमलबजावणी करायची होती त्यांनी घामाने डबडबलेला चेहरा पुसत ते याचकांना म्हणाले -"मायबापांनो नारायण मोठा दयाळु आहे. थोडा धीर धरा तुमची इच्छा तृप्त होईल. महाराज तसेच कचेरीला आले खजिनदाराला बोलावुन त्याच्याकडुन चाव्या घेतल्या खजिनदाराला वाटले महाराजांना खजिना तपासायचा असेल महाराज खोलीत आले व लगेच खजिना उघडला त्यातुन पैसे काढुन धोतराच्या सोग्यात घातले व बाहेर आले समोर चारपाचशे याचक उभे होते महाराजांनी प्रत्येकाला मुठभर पैसे देण्यास सुरवात केली महाराजा कुणाकडेही पहात नव्हते त्यांना पुढे आलेल्या हाताशिवाय काहीच दिसत नव्हते याचकांची आता मोजादाद करता येत नव्हती पुढे आलेल्या हातावर पैसे ठेवण्या व्यतिरिक्त्त भान आता महाराजांना राहिले नव्हते. कचेरीत हाहाकार उडाला आज महाराजांना झाले तरी काय ? सगळा खजिना लोकांना वाटुन टाकत आहेत किती वाईट परीणाम होईल याचा .? नको रे देवा, ती कल्पनाही करवत नाही असेच सगळेजण म्हणु लागले पण महाराजांना अडविण्याची हिंमत कुणालाही झाली नाही महाराज तर भान हरपुन पैसा वाटीत होते याचकांचे थवे तृप्त होऊन जात होते शेवटची मुठ महाराजांनी रिती केली आणि वर पाहिले सगळेजण तृप्त होऊन निघुन गेले होते महाराजांनी आत येऊन रिता खजिना बंद केला व कामकाजाच्या खोलीत आले. "

दिव्याच्या प्रकाशात झाला प्रकार झरझर लिहुन मोहोरबंद केला मग जासुदाला बोलावुन त्याला अहवाल तातडीने कलेक्टरसाहेबांकडे घेऊन जाण्याचा हुकुम दिला आणि ते शांतपणे घरी आले गावात तर प्रहरीच देवमामलेदार गोरगरिबांना खजिना वाटुन देत असल्याची बातमी पसरली होती लोकांना आठवण झाली ती दामाजीपंतांच्या गोष्टीची ! लोकांना हळहळ वाटली कारण महाराजांनी सरकारचा घोर अपराध केला होता आता चौकशी व तुरुंगवास नक्की होता देवमाणसावर काय ही वेळ आली असे म्हणुन काही लोक तर रडु लागले गोगरिबांसाठी ह्या महात्म्याने किती मोठ धोका पत्करला होता ! सर्व गावात खळबळ माजली होती तर महाराज इकडे घरी शांतपणे नामस्मरण करित होते मध्यरात्रीच्या सुमारास ते झोपी गेले दुसरा दिवस उजाडला आणि दुपारच्या आत प्रांतसाहेब घोड्यावर बसुन सटाण्यात आले त्यांना बघुन लोकांच्यास पोटात धस्स झाले महाराजांना बोलावणे धाडण्यात आले महाराज शांतपणे नामस्मरण करित साहेबांकडे आले साहेबांना नमस्कार करीत ते खाली बसले व झाला प्रकार सांगितला मी एक दोन दिवसात पैसे जमा करुन खजिन्यात भरतो म्हणुन दोन दिवसची मुदत द्यावी अशी विनंती महाराजांनी केली महाराजांबरोबर दीड ते दोन हजाराजांचा जमाव होताआलेले सर्व लोक महाराजांना वेढा देवुन बसलेले होते महाराज साहेबांना म्हणाले - साहेब आपण तुम्ही अनुज्ञा देत असाल तर मी मझ्या प्रयत्नाला लागतो अन्यथा तुम्ही जो हुकुम द्याल तो मी शिरसावंदय राहील महाराजांना अनुमती मिळाली महाराज जायला वळले पण लोक वेढा उठवायला तयार नव्हते वाणी शेठ म्हणाले ,"नाही महाराज तुम्ही इथुन हालायचे नाही, आम्ही पैशाच्या व्यवस्थेला लागतो लाख गेले तरी चालतील पण लाखांचा धनी शाबुत राहायला हवा ! देवा तुमच्या केसाला धक्का तर आमच्या प्राणाला धक्का तुमची इभ्रत ती सगळ्या गावाची इभ्रत! हे सत्यायन गाव आपले बोल खरे करुन दाखवील आपल्याला धक्का लागला तर आम्ही त्याचा प्राणपणाने मुकाबला करु ." महाराजांनी सर्वांना शांत करुन समजावले, महाराजांचे म्हणणे काहीसे लोकांना पटले सर्वजण उठुन चालु लागले पण वेढा तसाच कायम ठेवुन ! सर्वजण वाड्यावर आले. महाराजांची देवघरात पुजा संपत आलेली होती त्यांनी आरतीव व मंत्रपुष्पांजली म्हणुन फुले शाळीग्रामावर वाहिली पुजा आटोपुन महाराज थोड्याच वेळात कचेरित आले सारे गाव तिथे नाचत होते आपल्यावर प्रेम व उपकार करित असलेल्या जनता जनार्दनाला थोडेसे मागेच थांबण्याची विनंती करुन महाराज साहेबापुढे जावुन ऊभे राहिले तेव्हा रक्कम मोजुन झालेली होती दोनदा मोजली तरी रक्कम बरोबर एक लाख सत्तावीस हजार भरली होती ! ते पाहुन साहेब आश्चर्यचकित झाले महाराजांना पाहिल्यावर त्यांना वाटले हा खरोखर मनुष्य नसुन कुणीतरी देवलोकीचा पुण्यात्माच आहे. ते म्हणाले . अहो तुम्ही बसा ना पण मला सांगा हे सर्व कसे काय झाले आमच्या समक्ष पैसा वाटला असे लोक सांगतात पण इथे तिजोरी मात्र भरलेली आहे. आणि रक्कमही बरोबर एक लाख सत्तावीस हजार ! महाराज मंदस्मित करुन म्हणाले -"रावबहाद्दुरसाहेब, मी या हातांनी खजिना वाटला कसे झाले हे मलाही समजत नाही पण त्या लिलाविग्रही नारायणाने खजिना भरुन ठेवला हे मात्र नक्की ! साहेब तुम्हाला निष्कारण माझ्यामुळे त्रास झाला आता दोन-तीन दिवस शांतपणे इथे थांबावे अशी प्रार्थना आहे." ठीक आहे थांबुन जाऊ साहेब म्हणाले महाराजांनी जाण्याची अनुज्ञा मागितली तेव्हा अनुज्ञा देतांना साहेबांचे हात त्यांच्या नकळत जोडले गेले होते नंतर महाराज घरी परतले सवादय मिरवणुकीने महाराजांना घरी पोहचण्यास बराच उशीर झाला होता लोकांनी त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation