|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १२ ||

"बाळ माधवनाथाच्या आईने त्यांना श्री चरणी घातले."

महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सत्यायनातील पुलकीत वातावरणात साध्वी मथुराबाईंनी प्रवेश केला छोटा माधव तर आनंदाने उड्या मारु लागला होता ९-१० वर्षाच्या माधवाला येतांना अनेकांनी पाहिले होते सारखे बघतच रहावे असे राजबिंड व्यक्तिमत्व माधवचे होते गौरवर्ण, काळेभोर डोळे, भव्य कपाळ, उंच व सरळ नाक यांमुळे माधव दहाजणात उठुन दिसत होता सटाण्यात शिरल्यापासुन त्याची नजर सैरभैर झाली होती काहीतरी शोधत होती त्याची नजर पण स्थिर होत नव्हती."

एरव्ही गंभीर रहणारा माधव आज अधीर वाटत होता याचे कहिसे नवल वाटत असल्याने मथुराबाई देव मामलेदारांचे दर्शन लवकर व्हावे अशी मनोमन प्रार्थना करित होते थोड्याच वेळात त्या महाराजांच्या घरी पोहचल्या पाहतात तर दरवाजाशी महाराज स्वागतास हजर! दोघानीही महाराजांच्या दर्शन घेतले मथुरबाईंना शुभाशिर्वाद दिल्यावर महाराजांनी मथुराबाईकडे पाहुन विचारले "उज्जैनचा प्रसादना हा.?" महाराजांचा प्रश्न ऐकताच मथुराबाईंना सुखद आश्चर्य वाटले त्यांना महाराजांच्या त्रिकाल ज्ञानाची प्रचिती आली कारण मथुराबाई उज्जैनला आजोबांकडे असतांना एकां श्रावणी सोमवारी पुजा करीत होत्या तेथे एका तेजस्वी साधुने प्रसाद देवुन त्यांना "तुला प्रसादिक व अलौकिक व लोकोध्दारक पुत्र होईल " असा आशिर्वाद दिला त्यानंतर माधवचा जन्म झाला या मंडळीचा मुक्काम ७-८ दिवस सटाण्यात होता महाराज मथुराबाईंना म्हटले -"माधवची जोपासना जरा नीट करा हा तर गादीचा मालक आहे ! तीन महिन्यात दिसुन येईल, मात्र चित्रकुटी न्या महाराजांच्या उद्गारांचा फारसा बोध मथुराबाईला झाला नाही मात्र त्यांनी सटण्याहुन निघतांना माधवला महराजांच्या पायावर घातले महाराजांनी त्याच्यावर कृपाकटाक्ष टाकुन "अनाथ नाथ सनाथ " असा गुढ आशिर्वाद दिला तीन महिन्याच्या आत चित्रकुट जवळील करवी येथील पथसंप्रदायाच्य सिध्द गादिवर माधवला बसविण्यात आले पुढे ते माधवनाथ महाराज म्हणुन प्रसिद्ध पावले.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation