|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १० ||

"श्री यशवंत देव भावसमाधीत गेले व सत्रा पाटिललाही भावसमाधीत नेले."

महाराजांना भेटण्यास सत्रा पाटिल शिंदखेड्याहुन आले होते पाटिल स्वच्छ हातपाय धुवून महाराजांची वाट पहात वाडयावर बसले होते. थोड्याच वेळात महाराज सायंसध्या करुन बैठकीवर आले त्यांनी समोर पाहिले चौकात सत्रा पाटिल बसले होते महाराज चौकात आले तसे पाटलांनी महाराजांच्या पायावर लोळण घेतली त्यांना ऊठवुन महाराज म्हणाले - "पाटिलदादा आमचे पत्र मिळाले ना.?"

"होय देवा, पत्र मिळाले आणी पैसेही मिळाले ही घ्या पावती घेईन आणि पावतीचे काय एवढेसे.?" आता मात्र पाटलांच्या अश्रुंचा बांध फुटला आणि ते लहान मुलासारखे हुंदके देऊ लागले महाराजांनी त्यांना आत आणुन पाटावर बसविले पाटलांनी अश्रुंच्या ओलाव्यात शब्द मिसळले आणि अनंतसिंगाची इत्यंभूत हकिकत उपस्थित भक्तजनांना ऐकावयास मिळाली. महाराजांनी पाटलांची तळमळ ओळखली महाराज पाटलांना म्हणाले "दादा प्रभु दयाळू आहे. तुम्ही आता डोळे झाका आणि अंतकरणात वळुन पहा. पाटलांनी महाराजांच्या पायाला स्पर्श केला नंतर त्यांनी डोळे झाकले आणि त्यांना सर्व शरीरातुन वीज चमकत असल्यासारखे वाटले आणि समोर लाल, पिवळ्या व हिरव्या रंगांनी मिश्रीत असा धुसुर प्रकाशात त्यांचा प्राणप्रिय अनंतसिंग दिसु लागला पाटलांचे देहभान हरपले अनंतसिंगाच्या पायावर त्यांनी लोळण घेतली पाय धरुन ते म्हणाले,-"हे दीन दयाळु जगन्नाथा, ह्या पाप्याचा उध्दार करा देवा मला जन्ममरणाच्या दृष्टचक्रातुन मुक्त करा" अनंतसिंगाने त्यांना उठविले व म्हटले- "बाळ मी तुझी तळमळ जाणतो माझ्या प्राणप्रिय यशवंताच्या कृपेने तु ह संसारसागर तरुन जाशील " आणि अनंतसिंगाच्या प्रकाशात विलिन झाला पाटलांनी महाराजांना नमस्कार केला, त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू येत होते पाटील समोर भिंतीशी जाऊन बसले सुमारे दोन घटकानंतर महाराजांनी आपल्या हातांनी पाटलांना भोजन दिले दोन दिवस सटाण्यास राहुन पाटील घरी परतले आता त्यांची तळमळ संपली होती अपुर्व शांती व समाधानाने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला होता.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation