|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १ ||

"भगवान श्री हरीने दामाजी पंतास पुनर्वतार घेवुन पृथ्वीवर जन्म घेण्याची आज्ञा केली व दामाजीचे यशवंतरुपे अवतरणे."

महादेवपंताचे दुसरे अपत्य म्हणजेच संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज होय. संतांचे अवतार हे काही अपघात नसतात. अवतार व अवतार कार्याचे सुव्यवस्थित नियोजन जगन्नियत्याने केलेले असते. भगवतभक्त दामाजीपंत मंगळवेढे हरीपदी वैकुंठी पावल्यानंतर काहि कालांतराने श्रीहरीने त्यांना म्हंटले. "भूतलावर लोक पापकर्मात पैसे घालवित आहेत. म्हणून लोकांना भूतदया शिकविण्यासाठी तू अवतार घ्यावास."

दामाजींनी म्हंटले "देवा तुम्ही म्हणता ते ठीक आहे. पण ह्या मोक्षदायी भूतदयेचा भूतलावर प्रसार करण्यासाठी द्रव्य खूप लागेल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी अवतार घेतला व तु मला खुप धनवान केलेस तर मी खुप धर्म करीन पण त्यामुळे लोकांत भूतदया कशी वाढवणार? लोक म्हणतील आहे धनवान म्हणुन काही धन धर्मार्थ खर्च करतो. पण यामुळे पतितांचा उद्धार कसा होणार?" देव म्हणाले - "अरे मी तुला एक युक्ती सांगतो. मी काही तुला धनवान करणार नाही. तु लोकांकडुन उसने म्हणुन द्रव्य घ्यावयाचे व ते सर्व धर्म कार्यात खर्च करावयाचे म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील एक म्हणजे पापकर्माकडे जाणारे धन तुझ्याकडे येईल व तुझ्याकडून त्याचा विनीयोग गोरगरीबांसीठी होईल. द्रव्य दिल्यामुळे त्याला पुण्यलाभ होईल व गरिबांची दुःखे नाहीशी होतील. यात तुला यत्किंचितही दोष येणार नाही. ज्याप्रमाणे गवळी स्वतःच्या हाताने दुध साठवतो. त्याचे फळ गवळ्यालाच मिळते. पात्र मात्र त्यात दुध असुनही अलिप्त राहाते. तद्वतच तुला परद्रव्य स्वीकारल्याने दोष लागणार नाही. "ठिक आहे मी कुठे अवतार घेऊ ?" देव म्हणाले. "आपल्या पंढरी जवळच भोसे नावाचे गाव आहे. तिथे धोंडोंपंत नावाचा लेखनपटु वतनदार माझा भक्त आहे. तो माझी नरहरी स्वरुपात भक्ती करतो. त्याचा सदाचार संपन्न पुत्र महादेव आहे या महादेवपंतांच्या कुशीत तु जन्म घ्यावास." पुणे येथे शनिवार पेठेतील ओंकार वाडयात वाजपे राहात असत. तेथेच शालिवाहन शके १७३७ भाद्रपद शुध्द दशमी बुधवारी सूर्योदयीसमयी हरीदेवीला द्वितीय पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. १३ सप्टेंबर १८८५ रोजी संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा जन्म झाला.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation