|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| आरती १ ||
आरती यशवंता
सदगुरु समर्था
आरती ओवाळीतो
पदी ठेवुनी माथा ।।धृ।।
दुष्काळाचे काळी वेळी
गोर गरीब नारी
उदर भरण्या हो
रिक्त खजिना करी ।।१।।
आरती यशवंता.........
सटाणे ग्रामवासी
तुझी बघुन किर्ती
साधु देव मामलेदार
नाव ठेविले तुसी ।।२।।
जनता जन डोले
तुझे स्वरुप बोले
भक्त भानुदास
पदी मस्तक ठेले ।।३।।
आरती यशवंता.........

।।श्री यशवंत महाराज यांची आरती।।

। जयदेव जयदेव जय यशवंत स्वामी हो । यशवंत स्वामी ।।
। आरती ओवाळू मनोभावे भक्ती ।। जयदेव ।।
। पंचप्राणाची करुनी आरती । आशा ममता लावुनिया वाती ।।
। मनाचे घृत । घालोनिया प्रिती । प्रेमे ओवाळीता देतसे मुक्ती ।। जय ।।
। शुध्द सत्वाची मुर्ती पहाता । दर्शनमात्रे हरते भवसागर चिंता ।।
। मोह अंशही बंध तुटती आता । ही पुर्ण यश कृपेची सत्ता ।। जय ।।
। देशोदेशाहुनी अतिथी जे येती । वंदूनी पुजादिक आरती ।।
। तेणे मनोरथ पुर्ण होती । महिमा वर्णू किती अतिमंद मती ।।जय।।
। सटाणे ग्रामी प्रकट झाला । दिन-दुबळ्यासी खजिना वाटला ।।
। अधिका-याशी पुर्ण दाखवला । ही पुर्ण यश कृपेची सत्ता ।।जय।।

।। प्रार्थना ।।

। इरावती तीरी सत्यायन नगरी । नांदे देव पंढरी यशवंत हो ।
। उभा धर्म पीठावरी भक्तांची चिंता हरी । जण कल्याणकारी यशवंत हो ।।
। गृहस्थाश्रमा सारुनिया अपुर्वा । करी ज्ञानमार्गा यथोचित सर्वा।।
। विदेही परिपुर्ण योगी सुसंता । नमस्कार माझा सदगुरु यशवंता ।।
। जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे तो आपले।।
। तोची साधु ओळखावा ।। देव तेथेची जाणावा ।
। होते संग्रही पूर्व पुण्य म्हणुनी हा सदगुरु भेटला ।।
। ज्याने अज्ञ जनास पार करण्यास सन्मार्ग दाविला ।।
। केले पुर्ण मनोरथा झिजहुनी देहासी कष्ट पहा ।।
। त्या साधु यशवंत गुरुपदी माझा नमस्कार हा ।।

।। कृपाप्रसाद ।।

। भोसे गाव परम पवित्र । तेथे संतांचे वंशज ।
। जन्म झाला पुणे नगरी । देव झाले सटाणेनगरी ।
। देह ठेविला नाशिक नगरी । या संतांशी हेच विनवतो ।
। देइ मज कृपादान । भवबंधनी सोडवावे ।
। हीच प्रार्थना करीतो । देई आशिर्वाद गुरु यशवंता ।

।। अथ प्रार्थनाष्टक ।।

महाजान्हवी तैसि गोदावरी हे । सदाराम पदमी पदास्थीर वाहे ।।
तया गौतमी तीर वासी महंता ।। नमस्कार माझा तया यशवंता ।।१।।
चिदानंद आनंद सानंद मुर्ती ।। सुकिर्ती सुखानंद पूर्णेदु दीप्ती ।।
जगन्मान्य सामान्य आदित्यज्योती ।। तया चिंतने सर्वही सिध्द होती ।।२।।
जगीमान्य तो धन्य त्रैलोक्य झाला ।। क्षमा शांती वैराग्य निर्वेर ठेला ।।
जगी शत्रुमित्रा समत्वदयाब्धि ।। तया दर्शने उद्धरीजे भवाब्धि ।।३।।
जगी आर्य औदार्य धैर्यासिबाणी ।। जपे नारसिंहा नम्र वाणी ।।
सदा वाहिलादान धर्मासिबाणी ।। दयासिंधु हे ब्रिद लोकांत वाणी ।।४।।
महातत्वज्ञाना ह्रदयी साठविले ।। रमा वल्लभाते ह्रदयी आठविले ।।
जगी सज्जना दुर्जना नीववीले ।। ताचे पदी मस्तकी ठेवियले ।।५।।
जयाची वदे सर्वसिद्धांत वाणी ।। जयासी जनी वर्णिजे प्रेम वाणी ।।
जया वर्णिजे योगिये श्रेष्ठ मौनी ।। नुपेक्षी तया सर्वथा चक्रपाणी ।।६।।
सदा पुजना चिंतना भक्तीभावे ।। तझे पादपद्मी सदा भृंग व्हावे ।।
यदात्वदुणा कीर्तनी रंगवावे ।। करा जोडुनी मागतो हेचि द्यावे ।।७।।
सदा दान धर्माझियो माझिकाया ।। तदा सज्जना संगती देव कार्या ।।
उपेक्षानये श्रीमहा भाग्यवंता ।। वरा देईजे बाळकृष्णा समर्था ।।८।।

।। श्री बाळकृष्ण मोराणकर रचित ।।
।। श्री यशवंतराव महाराज आरती ।।

आरती श्री यशवंताची ।। पूर्णानंद सदयशाची ।।
सच्चिदानंद शांतमुर्ती ।। दर्शने त्रिविधतापहरती ।।
विपत्तीदैन्यदोष नुरती ।। समस्ता दया क्षमा वरिती ।।
प्रीत ती शांतिसागराची ।। महात्मा समदृष्टि त्याची ।।
जगी तो सांबची अवतरला ।। जगी तो सांबची अवतरला ।।१।।
त्रिलोका धन्य, सकल जगिमान्य, देसि धन धान्य ।।
कामना पुरविसमस्तांची ।। पूर्णानंद सदयशाची ।।
आरती श्री यशवंताची ।। पूर्णानंद सदयशाची ।।
भोसे वस्तिग्राम ज्याचा ।। भोसेकुळी पुण्यभुचा ।।
वदती साधुदेव तोचि ।। मामलेदार सत्यसाची ।।
ठाण रेखिले नाशिकासी ।। तसेचि बागलाणभूसी ।।
भक्ती ती महानृसिंहाची ।। भक्ती ती महानृसिंहाची ।।
हसतमुख बोल, सज्जनी डोल, किर्ती ते मोल ।।
होईना तोल जगती त्याची ।। पूर्णानंद सदयशाची ।।२।।
आरती श्री यशवंताची ।। पूर्णानंद सदयशाची ।।
त्रिगुण गुण गुण गांभिर्याचा ।। षदगुणैश्चर्य धैर्य साचा ।।
मूर्त केवळ औदार्याचा ।। जना सन्मार्ग दावि साचा ।।
आस बहु तव पद कमलाची ।। ज्ञान आणि मुक्ती दायकाची ।।
ब्रम्ही ब्रम्हचि समरसला ।। ब्रम्ही ब्रम्हचि समरसला ।।
त्रिपाता हरवि, क्लेश जो नुरवि , आस ती पुरवि ।।
शरण पदि बाळकृष्ण त्याची ।। पूर्णानंद सदयशाची ।।३।।
आरती श्री यशवंताची ।। पूर्णानंद सदयशाची ।।

।। अथ श्री शरणाष्टकम ।।

श्री यशवंता तव शरणं ।। जय यशवंता तव शरणं ।।धृ।।
जय यशलाभा पूर्ण कृपाला, अगणितलिला तव शरणं ।।
दीनोध्दारा तव शरणं ।। दीन दयाधन तव शरणं ।।१।।
दीनानाथा दीनदायाळा, दीनवत्सला तव शरणं ।।
वंशोध्दारा तव शरणं ।। वंशभुषणा तव शरणं ।।२।।
जगद्वंदया, जगद्भुषणा, जगद्धोरा तव शरणं ।।
ब्रम्हानंदा तव शरणं ।। ब्रम्हासनातन तव शरणं ।।३।।
पूर्णानंदा, पूर्ण परात्पर, अघटित घटना तव शरणं ।।
चिदानंदा तव शरणं ।। चिदाकशा तव शरणं ।।४।।
चिदात्मरुपा, चित्सुखकंदा, चित्सुखदायक तव शरणं ।।
महामान्या तव शरणं ।। जगन्मान्या तव शरणं ।।५।।
महायोगिया, योगदर्शना, योगभुषणा तव शरणं ।।
महागृहस्था तव शरणं ।। धर्मपालका तव शरणं ।।६।।
महान्याया न्यायभुषणा, महोदारा तव शरणं ।।
महाज्ञानिया तव शरणं ।। ज्ञानदायका तव शरणं ।।७।।
तत्वात्मका, तत्वदर्शका, तत्वपालका तव शरणं ।।
प्रसन्ननयना तव शरणं ।। प्रसन्नवदना तव शरणं ।।८।।

।। संत श्री यशवंतराव महाराज की आरती ।।

आरती करु यशवंत की, करु सदगुरु की प्यारे गुरुवर की,
आरती करु यशवंत की।।
जय गुरुदेव अमल अविनाशी, ज्ञान रुप अंतर के वासी,
पग-पग पद देते प्रकाश, जैसे किरणे दिनकर की ।।
आरती करु यशवंत की ।।१।।
जब से शरण तुम्हारी आये अमृत से मिठे फल पाये,
चरण तुम्हारे क्या है छाया, कल्पवृक्ष तरुवर की ।।
आरती करु यशवंत की ।।२।।
ब्रम्हज्ञान के पुर्ण प्रकाशक, योगदान के अटल प्रवर्तक,
जय गुरु-चरण-सरोज मिटा दी, व्यथा डर की,
आरती करु यशवंत की ।।३।।
अंधकार से हमे निकालास दिखलाया है अमर उजाला,
कबसे जाने छान रहे थे हाक सुनो दर दर की,
आरती करु यशवंत की ।।४।।
यशवंत हे सदुगुरु दाता "शक्तीपात" के दिव्य प्रदाता,
करके वास सत्यानपुरी, भव-बांधा हर ली जन की
आरती करु की, करु यशवंत की, प्यारे गुरुवर की,
आरती करु यशवंत की ।।५।।

।। ।। जयजयकार ।। ।।

। श्री संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज की जय
। श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ।
ऊँ नमो भगवते वासुदेवाय

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation